IPL 2019 एलिमिनेटर | दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान

हा सामना राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळला जात आहे. 

Updated: May 8, 2019, 09:30 PM IST
IPL 2019 एलिमिनेटर | दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान  title=

विशाखापट्टणम :   हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान दिले आहे. हैदराबादने निर्धारित २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १६२ रन केल्या. हैदराबादकडून मार्टिन गुप्टीलने सर्वाधिक ३६ रन केल्या. तर मनिष पांडेने देखील ३० रन करत चांगली साध दिली.

दिल्लीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादची सावध सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी ३१ रनची पार्टनरशीप झाली. हैदराबादला पहिला झटका ऋद्धीमान साहाच्या रुपात लागला. त्याला इशांत शर्माने आऊट केले. साहानंतर मैदानात मनिष पांडे आला. दुसऱ्या ठिकाणी ओपनर मार्टिन गुप्टीलने आपला आक्रमक मारा सुरुच ठेवला होता. गुप्टील-पांडे जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २५ रन जोडल्या. 

लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा 

हैदराबादचा ५६ स्कोअर असताना दुसरी विकेट गेली.  मार्टिन गुप्टील फटकेबाजी करण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. गुप्टीलने स्फोटक ३६ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या विकेटसाठी मनिष पांडे आणि कॅप्टन केन विलियमसन यादोघांनी टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतु हा प्रयत्न जास्त वेळ कायम ठेवता आला नाही. किमो पॉलने मनिष पांडेला ३० रनवर  कॅच आऊट केले. पांडे-विलियमसन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३४ रनची भागीदारी झाली. 

हैदराबादच्या पहिल्या तीन विकेटसाठी अनुक्रमे ३१, २५ आणि ३४ रनची छोटेखानी पार्टनरशीप झाली. परंतु कोणत्याच जोडीला मोठी पार्टनरशीप करता आली नाही. अखेरच्या टप्प्यात विजय शंकर  आणि मोहम्मद नबी या दोघांनी फटकेबाजी केली. 

दिल्लीकडून किमो पॉलने सर्वाधिक ३विकेट घेतल्या.  तर इंशात शर्माने २ विकेट घेतल्या.  अमित मिश्रा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली. 

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामन्याला सुुरुवात झाली आहे.  दिल्लीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंत या दोन्ही टीममध्ये एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 9 मॅचमध्ये हैदराबाद तर 5 मॅचमध्ये दिल्लीचा विजय झाला आहे. या आकडेवारीनूसार हैदराबादचा पलडा भारी दिसत आहे.

 

 

 

प्ले-ऑफमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही टीम आजचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. आज जी टीम जिंकेल ती चेन्नई विरुद्ध क्वालिफायर-२ मॅच खेळेल. वर्ल्डकपच्या सरावासाठी डेव्हिड वॉर्नर आणि जॉन बेअरेस्टो मायदेशी परतले आहेत. त्यामुळे कमकुवत झाला आहे. तर कगिसो रबाडा टीममध्ये नसल्याने दिल्लीला त्याची कमी जाणवेल. 

विजय शंकरकडून अपेक्षा 

आजच्या सामन्यात विजय शंकरकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. शंकरने यंदाच्या पर्वात  219 रन केल्या आहेत. तसेच त्याने विकेट देखील घेतली आहे. त्याच्या अशा अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या कडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. विजय शंकरची वर्ल़्डकपसाठी निवड करण्यात आली आहे.

दिल्लीच्या बॅट्समनचे आव्हान 

दिल्लीच्या शिखर धवन, कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या तिकडीला रोखावे लागेल. या तिघांनी यंदाच्या पर्वात अनुक्रमे ४८६, ४४२ आणि ४०१ धावा केल्या आहेत. हैदराबादच्या बॉलर्सपुढे दिल्लीच्या बॅट्समनना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

हैदराबादच्या बॅटिंगची जबाबदारी ही  मनीष पांडे, कॅप्टन केन विलियम्सन, मार्टिन गुप्टील यांच्यावर असेल. तर बॉलिंगची मदार ही खलिल अहमद, भुवनेश्वर कुमार रशीद खान आणि महमद नबी यांच्यावर असणार आहे.     

हैदराबाद टीम : केन विलियम्सन ( कॅप्टन ), मार्टिन गुप्टिल, रिद्धिमान साहा, मनीष पांडे, विजय शंकर, दीपक हुड्डा, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, बासिल थम्पी 

दिल्ली टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, कॉलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड, अक्षर पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा.