Fifa World Cup Emiliano Martinez : फिफा वर्ल्ड कप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरले आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार लियोनेल मेस्सी (lionel messi) आणि गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martinez) ठरला आहे.लियोनेल मेस्सीने गोल्ड बॉल,तर एमिलियानो मार्टिनेझने गोल्डन ग्लोव्हचा पुरस्कार जिंकलाय. दरम्यान हा पुरस्कार स्विकारतानाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील एमिलियानो मार्टिनेझच्य़ा कृतीवर नेटकरी संतापले आहेत. नेमकं त्याने व्हिडिओत काय केले आहे, हे जाणून घ्या.
अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने (Emiliano Martinez) 'गोल्डन ग्लोव्ह' ची (Golden Glove) ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो खूप खुश दिसत होता. पण ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मार्टिनेझने एक कृत्य केले होते. हे त्याचे कृत्य अनेकांना पचले नाही आहे.त्यामुळे अनेकांनी एमिलियानो मार्टिनेझच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भाततला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martinez) त्याची 'गोल्डन ग्लोव्ह' (Golden Glove) ट्रॉफी घेण्यासाठी मंचावर पोहोचला होता. यावेळी त्याने ट्रॉफी स्विकारल्यानंतर प्रेक्षकांच्या दिशेने दाखवताना वेगळीच कृती केली.ही कृती पाहुन अनेकांच्या भूवय्या उंचावल्या होत्या. दरम्यान आता मार्टिनेझच्या या कृतीवर नेटकरी संताप व्यक्त करतायत.
Emi Martìnez wins the golden glove.
And then does this with it. pic.twitter.com/Mt43auNBJX
— Gareth Davies (@GD10) December 18, 2022
अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कपवर विजय मिळवल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता.या सोहळ्यात फ्रान्सचा किलियन एमबाप्पेला गोल्डन बूटचा पुरस्कार देण्यात आला होता. अर्जेंटिनाचा एमिलियानो मार्टिनेझला (Emiliano Martinez) 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लियोनेल मेस्सीला (lionel messi) गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला. तर अर्जेंटिनाचा एन्झो फर्नांडीझने (Enzo Fernandez) FIFA विश्वचषक 2022 चा ‘यंग प्लेयर’ पुरस्कार जिंकला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फर्नांडीझने गोल करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली होती.
दरम्यान या पुरस्काराची चर्चा असतानाच आता एमिलियानो मार्टिनेझचा (Emiliano Martinez) ' तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करून आक्षेप नोंदवतायत.