मुंबई : टीम इंडियाच्या (Indian Cricket team) एकदिवसीय कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी काढून ती रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आली. यानंतर टीम इंडियात कुठेतरी सर्व आलबेल नसल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरु झाली. यानंतर आज मंगळवारी विराट कोहली (Virat Kohli) आफ्रिका विरुद्धच्या (India Tour Of South Africa 2021) एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान आता विराट वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही, याबाबतची माहिती बीसीसीआयच्या (Bcci) एका अधिकाऱ्याने दिली आहे. (former team india odi captain virat kohli did not out of one day series against south africa says bcci)
बीसीसीआयचा अधिकारी काय म्हणाला?
"विराटने आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती हवी आहे, या विषयी कोणताही औपचारिक पत्रव्यवहार केलेला नाही", अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
"मात्र यानंतर जर काही पुढे निर्णय घेण्यात आला किंवा त्याला दुखापत झाली, तर विराट वनडे सीरिजमध्ये न खेळण्याचं समजू शकतो. सध्या स्थितीनुसार विराट वनडे सीरिजमध्ये खेळेल", असंही या अधिकाऱ्याने नमूद केलं.
कसोटी मालिकेपासून आफ्रिका दौऱ्याची सुरुवात
टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. विराट कसोटी मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर वनडे सीरिज खेळवण्यात येईल.