१०० बॉल क्रिकेटसाठी हरभजन सिंग निवृत्ती घेणार?

इंग्लंडमध्ये लवकरच १०० बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे

Updated: Oct 4, 2019, 04:20 PM IST
१०० बॉल क्रिकेटसाठी हरभजन सिंग निवृत्ती घेणार? title=

लंडन : इंग्लंडमध्ये लवकरच १०० बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच या प्रकारच्या क्रिकेटचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. १०० बॉल क्रिकेटच्या ड्राफ्टमध्ये हरभजन सिंगचं नाव आहे. म्हणजेच हरभजनने १०० बॉल क्रिकेटमध्ये सहभागी व्हायला परवानगी दिली आहे. आता या खेळाडूंवर बोली लागणार आहे. ही लीग पुढच्यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे.

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) १०० बॉल क्रिकेट लीगसाठी ८ टीमची घोषणा केली आहे. यामध्ये लंडन स्पिरीट, नॉर्थन सुपरचार्जर्स, साऊथर्न ब्रेव, बर्मिंघम फोनिक्स, मॅनचेस्टर ओरिजिनल्स, ओवल इनविसिंबल्स, ट्रेंट रॉकेट्स आणि वेल्श फायर या ८ टीम १०० बॉल क्रिकेट लीगमध्ये असतील.

हरभजन सिंगने या लिलावासाठी त्याची बेस प्राईज १ लाख पाऊंड (जवळपास ८७.५ लाख रुपये) ठेवली आहे. १०० बॉल लीगच्या ड्राफ्टमध्ये २५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंवर २० ऑक्टोबरला लंडनमध्ये लिलाव होणार आहे.

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग जवळपास ३ वर्ष टीम इंडियामधून बाहेर आहे, पण त्याने अजूनही निवृत्ती घेतलेली नाही. १०० बॉल क्रिकेट खेळण्यासाठी हरभजन निवृत्तीची घोषणा करु शकतो, अशी शक्यता आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार परदेशी क्रिकेट लीगमध्ये भाग घेण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूला संन्यास घ्यावा लागतो.