'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहित शर्माचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला!

Harbhajan Singh On Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) जिंकता आली नाही आता वेस्ट इंडिज दौऱ्याचं काय कौतूक, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता रोहितचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकल्याचं दिसून आलंय.

Updated: Jul 11, 2023, 05:55 PM IST
'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहित शर्माचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला! title=
Harbhajan Singh On Rohit Sharma

Harbhajan Singh on Rohit Sharma: कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ उद्यापासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. पहिली कसोटी सामना (India vs West Indies, 1st Test) डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जाणार असल्याने आता टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) जिंकता आली नाही आता वेस्ट इंडिज दौऱ्याचं काय कौतूक, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता रोहितचा विषय निघताच हरभजन (Harbhajan Singh On Rohit Sharma) चांगलाच भडकल्याचं दिसून आलंय.

हरभजन काय म्हणतो?

आजकाल सोशल मीडियाचा काळ असल्यानं लोकं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असतात. क्रिकेट हा सर्वांनी एकत्रितरित्या खेळण्याचा सांघिक खेळ आहे. त्यासाठी एका व्यक्तीला जबाबदार धरणं योग्य नाही, असं म्हणत हरभडनने टीकाकारांची खरडपट्टी काढली. ज्या प्रकारे रोहितवर टीका केली आहे, त्यातून दिसून येतंय की लोकांनी खूप मर्यादा ओलांडली आहे. ज्यांना साधी बॅट हातात धरता येत नाही आजकाल ते सुद्धा रोहितवर खालच्या स्तरावर टीका करत आहेत, असं म्हणत हरभजनने चांगलाच टोला लगावला. 

येत्या काही महिन्यात कॅप्टन रोहित शर्माला सर्वांच्या पाठिंब्याची गरज भासेल, असं म्हण हरभजनने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये चांगली कामगिरी केली नाही. तुम्ही त्या कामगिरीबद्दल बोलू शकता, मात्र टीका करताना विचार करायला हवा, असंही हरभजन सिंह म्हणतो. एकट्या रोहित शर्मावर टीका करणं योग्य नाही. म्हणे तो धावा काढत नाही, वजन कमी करत नाही, कॅप्टन देखील नीट नाही. माझ्या मते तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे, असं म्हणत हरभजनने रोहित शर्माचं कौतूक केलं. 

आणखी वाचा - IND vs WI: रोहितने घेतली रहाणेची शाळा, अज्जूला प्रश्नाचा नूर समजला अन् खदकन हसला; पाहा Video

दरम्यान, डॉमिनिका येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात आता टीम इंडिया कशी कामगिरी करेल हे पाहवं लागणार आहे. दोन्ही सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या सलामीचा नारळ फोडणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी