कोलकत्ता : भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे. त्याच्या पत्नीने हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंधांपासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे गंभीर आरोप केले आहेत.
दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक वाढत चालले आहे. इतकंच नाही तर शमीबद्दल खुलेपणाने बोलायला लागल्यापासून तिला सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत, असे तिचे म्हणणे आहे. यासाठी तिने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींकडेही मदतीची याचना केली आहे.
मात्र या सर्व प्रकरणामागील सत्य अजूनही पडद्याआडच आहे.
सुरुवातीपासूनच हे प्रकरण शांतपणे हाताळणाऱ्या पत्नीने केलेले सर्व आरोप शमी फेटाळून लावले आहेत. मला फसवण्याचा हा प्रयत्न आहे, असे शमीचे म्हणणे आहे. हे कौटुंबिक प्रकरण चव्हट्यावर आल्याने बाहेरचे लोक त्याचा फायदा घेऊ लागले आहेत. आपल्या मुलीसाठी शमी बायकोशी पॅचअप करायला तयार आहे. मात्र हे सगळे शमी भितीपोटी करत असल्याचे हसीनचे म्हणणे आहे.
मात्र आता या प्रकरणाला वेगळा वास येऊ लागला आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहॉच्या नावे असलेले कोटींचे फार्म हाऊस यांच्या वादाचे कारण असू शकते, असे म्हटले जात आहे.
अमरोहा जनपदच्या सहसपूर अली नगर गावातील निवासी मोहम्मद उस्मान यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीने क्रिकेट विश्वातील यशानंतर हसीनसाठी कोट्यावधींचे हार्म ङाऊस खरेदी केले. जे शमीच्या गावापासून १ किलोमीटर दूर आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ते वसलेले आहे.
हे फार्म हाऊस हसीन आणि शमी दोघांच्याही नावावर आहे. मात्र ते फक्त हसीनच्या नावे नसल्याने हसीन शमीवर काहीशी नाराज होती. त्यामुळे हे हार्म हाऊस या वादाचे कारण तर नाही ना ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र याला दुजोरा देणारे कोणतही माहिती समोर आलेली नाही.