मुंबई : दुबईत सुरु असलेल्या आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ निश्चित झाला आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर 5 विकेटने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. डेरिल मिचेलच्या झुंजार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला.
विजयाचं 166 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सने सलामीच्या मार्टिन गुप्टीलला पॅव्हिलेअिनचा रस्ता दाखवला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला केन विल्यमसनही अवघ्या 5 धावा करुन बाद झाला. पण डेरिल मिचेलन मैदानावर तळ ठोकत एकाकी झुंज दिली. षटकार आणि चौकारांची बरसात करत न्यूझीलंडला दमदार विजय मिळवून दिला. मिचेलने 72 धावांची नाबाद विजय खेळी केली. अवघ्या 47 बॉलमध्ये मिचेलने 4 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली.
टॉस जिंकत न्यूझीलंडने (New Zealand) पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या जोस बटलर आणि बेअरस्टोने इंग्लंडला (England) चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागिदारी केली. पण पाचव्या षटकात न्यूझीलंडच्या मिल्नेने इंग्लंडला पहिला धक्का दिला. बटलर 13 धावांवर बाद झाला. यानंतर जोस बटलरही 29 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण यानंतर डेव्हिड मलान आणि मोईन अलीने फटकेबाजी करत इंग्लंडला चांगला मोठा स्कोर उभा करुन दिला. मोईन अली (नाबाद 52) आणि डेविड मलान (42) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 166 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडतर्फे टीम साऊदी, अॅडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशमने प्रत्येकी एक विकेट घेतली.