World Cup 2023: भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्डकपच्या सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. 15 तारखेला जर या सामन्यात पाऊस पडला तर सामना रिझर्व्ह डे ला खेळवला जाणार आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की, रिझर्व्ह डेच्या दिवशी पाऊस पडला तर काय?
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकले आहेत. यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर दुसरी सेमीफायनल 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. अशातच जर सेमीफायनलच्या रिझर्व्ह डेच्या दिवशीही पाऊस पडला तर कोणाला फायनलचं तिकीटं कोणाला मिळणार हे पाहूयात.
सेमीफायनलच्या सामन्यांसाठी रिझर्व्ह डेची व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे जेणेकरून पाऊस पडल्यास सामना पूर्ण करता येईल. मात्र जर राखीव दिवशीही पाऊस पडला तर आयसीसीने या परिस्थितीसाठीही नियम बनवला आहे.
रिझर्व्ह डेच्या दिवशी पाऊस पडल्यास नियमानुसार, जी टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असणार आहे, ती थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.
भारत-न्यूझीलंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास, भारत फायनलमध्ये जाणार आहे. याच कारण म्हणजे टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सेमीफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दक्षिण आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असल्याने ती फायनलमध्ये जाणार आहे.
टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य राहिली असून आपण सलग 9 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाकडून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 15 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून फायनलमध्ये गाठण्याची संधी आहे.