मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी जगभरातील अनेक जण उत्सूक असतात. आज कोहली हा सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये असल्याचेही अनेक दिग्गजांनी म्हटले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, 'त्याचा छोटा मुलगा कोहलीच्या फलंदाजीचा चाहता आहे. त्याला त्याची फलंदाजी पाहणे इतके आवडते की तो आऊट झाल्यानंतर तो सामना पाहत नाही.'
एका इंग्रजी वेबसाईटवर बोलताना वॉन म्हणाला की, 'माझा सर्वात लहान मुलगा एक तरुण खेळाडू आहे आणि तो नेहमी म्हणतो की, जेव्हा जेव्हा विराट फलंदाजीला येतो तेव्हा मला उठवा. विराट कोहली आऊट होताच त्याने इतर कामे करण्यास सुरवात केली. विराटचा मुलांवर अशा प्रकारचा प्रभाव आहे."
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये जलद 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम केला. तिसर्या सामन्यात त्याला भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या वेगवान 12 हजार वन डे धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 23 धावा करताच तो सचिनचा हा रेकॉर्ड मोडणार आहे.
"विराट कोहलीच्या फलंदाजीची कोणतीही चिंता नाही. तो एक उत्तम खेळाडू आहे आणि यात कोणती शंका नाही की तो प्रत्येक स्वरूपातील क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू आहे."