विराट राहुलची दमदार खेळी, अफगाणिस्तानला 213 धावांचं आव्हान

विराटचं शतक तर राहुलची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना धू -धू धूतलं

Updated: Sep 8, 2022, 09:24 PM IST
विराट राहुलची दमदार खेळी, अफगाणिस्तानला 213 धावांचं आव्हान title=

Asis Cup 2022 :  आशिया कपमधील शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं. विराटच्या शतकी आणि के. एल. राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.  
 
अफगाणिस्तानने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून आज सलामीला रोहित शर्मा बाहेर बसल्यामुळे विराट कोहली आणि के. एल. राहुल आले होते. दोघांनी सुरूवातीला सावध खेळी केली. खेळपट्टीवर तग धरल्यावर विराट आणि राहुलने आपला क्लास दाखवला. विराटने 61 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये विराटने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर के. एल. राहुलने 41 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने 62 धावा केल्या. 

अफगाणिस्तानच्या फरीद अहमदने राहुल आणि सुर्यकुमार यादवला बाद केलं. परंतू सर्वाधिक 57 धावा त्याने बहाल केल्या. फरीद अहमद सोडता इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही.

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यापासून मैदानावर संघर्ष करताना पाहायला मिळत होता. त्याने याआधी अर्धशतकं झळकावली होती. पण आज त्याने शतक झळकावत टीकाकरांना उत्तर दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे त्याचं पहिलं टी20 शतक आहे. आशिया कप 2022 मधलं देखील हे पहिलं शतक आहे. विराट कोहलीच्या नावावर याआधी वनडे आणि टेस्ट मिळून 70 शतकं होती. आता टी20 मध्ये पहिलं शतक झळकावल्या नंतर त्याच्या नावावर 71 शतकांची नोंद झाली आहे.