Ashwin-Jadeja Viral Video : 'एक तेरा एक मेरा..' अश्विन-जडेजाने शेअर केले 47 विकेट...

Ashwin-Jadeja Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया  (India vs Australia Test) यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रा झाल्यानंतर अश्विन-जडेजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तुम्ही पाहिला का व्हिडीओ? नक्की पाहा 'एक तेरा एक मेरा..' म्हणत त्या दोघांनी...

Updated: Mar 14, 2023, 09:44 AM IST
Ashwin-Jadeja Viral Video : 'एक तेरा एक मेरा..' अश्विन-जडेजाने शेअर केले 47 विकेट... title=
IND Vs AUS 2023 Jadeja Ashwin Ek Tera Ek Mera Funny Video famous scene from akshay kumar movie Viral Video Social media trending

Ashwin-Jadeja Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया  (India vs Australia Test) यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रा झाला. पण भारताने 2-1 अशी मालिका खिशात घालती. मायदेशात सलग 16 कसोटी सामने भारताने जिंकून इतिहास रचला आहे. असा रेकॉर्ड आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदेखील करु शकलेला नाही. दुसरीकडे अश्विन आणि जडेजाने या संपूर्ण मालिकेत तुफान बॉलिंग केली. त्यांचा बॉलिंग समोर कांगारुंना घाम फुटला.  अश्विनने मालिकेत 25 तर जडेजाने 22 विकेट्स घेतल्या...त्यानंतर या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (IND Vs AUS 2023 Jadeja Ashwin Ek Tera Ek Mera Funny Video famous scene from akshay kumar movie Viral Video Social media trending)

'एक तेरा एक मेरा..' 

तुम्हाला बॉलिवूडमधील अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) रावडी राठोरमधील (Rowdy Rathore 2) फेमस डॉयलॉग आठवतो का? या फेमस डॉयलॉगवर आतापर्यंत लाखो रील्स आपल्याला सोशल मीडियावर पाहिला मिळतात. याच डॉयलॉगवर अश्विन (Ashwin) आणि जडेजाचा (Ravindra Jadeja) मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओ चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.  'एक तेरा एक मेरा..' म्हणत या दोघांनी 47 विकेट्सची वाटणी केली आहे.  तुम्ही पण हा भन्नाट व्हिडीओ..(Ek Tera Ek Mera reels)

'नातू-नातू' गाण्यावर डान्स

rashwin99 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्विनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बनवताना त्यांनी 'नातू-नातू' गाण्याचाही (Natu-Natu Song Won Oscars 2023) वापर केला आहे.  एसएस  राजामौली यांच्या "RRR" चित्रपटातील सुपरहिट गाणे 'नातू-नातू'ला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwin (@rashwin99)

त्यामुळे त्यांनी या रीलमध्ये या गाण्या प्रती सन्मान व्यक्त केली आहे. (Natu Natu Song Won Best Original Song Award in Oscars).  दरम्यान, अश्विन आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्लेयर ऑफ द सिरीज ट्रॉफीदेखील शेअर केली. त्यावेळी आश्विनने जडेजाचं भरभरून कौतुक केलं.