...अन् कार्तिकच्या आला जीवात जीव! हाताने बेल्स पाडूनही धोकादायक मॅक्सवेल आऊट? पाहा व्हिडीओ

ग्लेन मॅक्सवेलच्या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Updated: Sep 25, 2022, 09:58 PM IST
...अन् कार्तिकच्या आला जीवात जीव! हाताने बेल्स पाडूनही धोकादायक मॅक्सवेल आऊट? पाहा व्हिडीओ title=

Dinesh Kartik Runout Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (INDvsAUSt-20) शेवटच्या सामन्यातील ग्लेन मॅक्सवेलची विकेट वादग्रस्त ठरली. अक्षर पटेलने केलेला थ्रो स्टम्सवर लागण्या अगोदरच भारताचा कीपर दिनेश कार्तिकच्या हाताने बेल्स पडल्या होत्या. (Dinesh Kartik Runout Glenn Maxwell) थर्ड अम्पायरने मॅक्सवेलला बाद ठरवलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (ind vs aus t20 Trnding Dinesh Kartik Runout Glenn Maxwell Viral Video Sport News)

नेमकं काय घडलं?  
रोहितने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पॉवरप्लेमध्ये ग्रीनने भारतीय फलंदाजी फोडून काढली होती. 19 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकलं होतं. मात्र फिंच आणि ग्रीन बाद झाल्यानंतर मैदानात मॅक्सवेल आणि स्मिथ होते, यादरम्यान युजवेंद्र चहलच्या 8 व्या षटकामध्ये हे नाट्य घडलं.

चहलच्या चौथ्या चेंडूवर मॅक्सवेल स्ट्राईकवर होता  हा चेंडू त्याने जोरात टोलावला. दोन धावा घेण्यासाठी त्याने स्मिथला कॉल दिला, मॅक्सवेल सहज जाईल असं वाटत होतं. अक्षर पटेलचा थ्रो एकदम करेक्ट आला मात्र कार्तिकच्या हाताने बेल्स पडल्या त्यानंतरही थ्रो स्टम्पवर बसल्याने त्याला बाद देण्यात आलं. 

 

दरम्यान, काहींच्या मते पंचांनी मॅक्सवेलवर अन्याय केला आहे. मॅक्सवेलच्या विकेटचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात चांगली झाली नाही. फिंच 7, स्मिथ 9, मॅक्सवेल 6, जोश 24,वाडे 1, डेनियल 22 धावा करून बाद झाले. तर कॅमेरॉन ग्रीन 52 आणि टीम डेविड 54 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. या धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 186 धावा केल्या आहेत. टीम इंडियासमोर आता 187 धावांचे आव्हान आहे.