Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : ढाका येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला (Bangladesh vs India) विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाच्या (Team India) दिवसअखेर 4 विकेट पडल्या आहेत. त्यामुळे सामना आता रंजक अवस्थेत पोहोचला आहे. दोन्ही संघाना जिंकण्याची संधी दिसत आहे. सध्या दोन टेस्ट सामन्यात टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
बांगलादेशने टीम इंडियासमोर (Bangladesh vs India) विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेला टीम इंडियाचा (Team India) डाव चांगलाच गडगडला आहे. टीम इंडियाचे 4 खेळाडू 45 धावावर आऊट झाले आहेत. तर सध्या जयदेव उनाडकट (3 धावा) आणि अक्षर पटेल (26 धावा) करून मैदानावर आहेत.
बांगलादेशच्या (Bangladesh vs India) मेहदी हसन (Mehidy Hasan) मिराजने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि शुभमन गिल या बड्या विकेट घेतल्या आहेत. तर शाकिब अल हसनने केएल राहुलला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाच्या सध्या 45 धावावर 4 विकेट पडल्या आहेत.
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या डावात 4 विकेट गमावून 45 धावा केल्या आहेत. आता टीम इंडियाला फक्त विजयासाठी 100 धावांची गरज आहे. टीम इंडियाकडे सध्या रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू आहेत. जे सामना जिंकवून देऊ शकता. तर बांगलादेशला देखील 6 विकेटची गरज आहे. या 6 विकेट काढून ते विजय मिळवू शकतात.
बांगलादेशचा (Bangladesh) लिटन दासनेही नुरुल हसनसोबत 46 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नुरुलने 29 चेंडूत 31 धावांची जलद खेळी खेळली. यानंतर लिटनने तस्किन अहमदसोबत आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे बांगलादेशने 231 धावापर्यंत मजल मारली. तर लिटनने 73 धावांची खेळी केली. तस्किन 31 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतले.
दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे.