IND vs ENG 2nd Test Day1: आजचा खेळ संपला, पंतकडून अपेक्षा वाढणार

 ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावा काढून नाबाद आहेत. रविवारी या दोन फलंदाजांवर मोठी खेळी खेळण्याची जबाबदारी असेल.

Updated: Feb 13, 2021, 06:45 PM IST
IND vs ENG 2nd Test Day1: आजचा खेळ संपला, पंतकडून अपेक्षा वाढणार title=

चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लड पहिल्या दिवसाचा खेळ आज संपला आहे. भारतानं पहिल्याच दिवशी 300 धावांची मजल मारली. अजिंक रहाणे आणि रोहित शर्मानं आजच्या दिवसात तुफान फलंदाजी करत भारताला मजबूत केलं. भारताचे 6 गडी बाद झाले असून सध्या 300 धावांवर खेळ थांबला आहे.

रविवारी पुन्हा हा खेळ सुरू होईल. यावेळी क्रिजवर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल असणार आहेत. दोघंही उद्या उर्वरित खेळ पुढे नेणार असल्यानं आता सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

ऋषभ पंतला साथ देण्यासाठी आलेल्या रविचंद्रन अश्विनला लांब डाव खेळता आला नाही. त्याने केवळ 13 धावा केल्या जे रूटने टाकलेल्या बॉलवर तो आऊट झाला आणि त्याला तंबूत परतावे लागले. 

मोईन अलीने भारतीय संघाला मोठा झटका दिला. रोहित शर्माला साथ देणारा अजिंक्य रहाणे मोईनच्या बॉलवर आऊट झाला. अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी केली. 149 चेंडूमध्ये 67 धावा काढून बाद झाला. या डावात त्याने 9 चौकार मारले.

तर गील आणि कर्णधार विराट कोहलीला मैदानात येताच मोठी निराश झाला. दोघंही 0 धावांवर आऊट झाले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. पुढे रोहित शर्मा मैदानात उतरला आणि त्यानं पहिल्या सामन्यातील कसर आज भरून काढली. रोहित शर्मानं 1 शतक आणि 1 अर्ध शतक करत भारतीय संघाला मजबूती मिळवून दिली. त्यामुळे संघाच्या आशा पल्लवीत झाल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 6 गडी राखून 300 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावा काढून नाबाद आहेत. रविवारी या दोन फलंदाजांवर मोठी खेळी खेळण्याची जबाबदारी असेल.