विराटपेक्षा सरस हिटमॅन रोहित, टीमची सूत्र हाती घेताच विजय आणला खेचून

रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची सूत्र आली आणि मैदानात तुफान आलं. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये अख्खा गेम फिरला.

Updated: Mar 19, 2021, 10:47 AM IST
विराटपेक्षा सरस हिटमॅन रोहित, टीमची सूत्र हाती घेताच विजय आणला  खेचून title=

मुंबई: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना जोरदार रंगला. या सामन्यात भारतीय संघानं निसटता विजय खेचून आणल्याचं पाहायला मिळालं. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड दोन्ही संघानी 2-2 अशी बरोबरी केली आहे. 

चौथ्या टी -20 सामन्यात  गुरुवारी भारतीय संघानं इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. हा विजय टीम इंडियासाठीही खास आहे कारण या सामन्याच्या अखेरच्या 4 ओव्हरमध्ये रोहित शर्माने आपल्या कौशल्यानं निसटता विजय खेचून आणला आहे. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळे तो बाहेर गेला. त्यामुळे पुढचा डाव सावरण्याची आणि कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे आली. 

फील्डिंग करताना विराट कोहलीला त्रास झाला त्यामुळे तो मैदान सोडून बाहेर पडला. मैदानात सुरू असलेल्या खेळाची सूत्र रोहित शर्माकडे आली. त्याने शेवटच्या 4 ओव्हर्सची रणनिती आखली आणि इंग्लंडच्या खेळाडूंना एकामागोमाग तंबूत धाडले. 

त्याच दरम्यान इंग्लंच्या संघाला विजयासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता होती. रोहित शर्माकडे सूत्र आल्यानंतर संपूर्ण डावच पालटला. 17 वी ओव्हर शार्दुल ठाकूला बॉल टाकण्यासाठी देण्यात आली. रोहितनं शार्दुलला कानमंत्र दिला आणि पुढे धडाधड एकामागे एक आऊट होत गेले.

शार्दुलच्या पहिल्या 3 बॉलवर इंग्लंडच्या फलंदाजाने चौकार आणि षटकार लगावले. त्यामुळे शार्दुलवर दबाव आला. मात्र रोहित शर्मानं परिस्थिती सांभाळली आणि शार्दुलला धीर दिला. त्यानं दिलेलं बळ कामी आलं आणि बाजी पलटली.