Who Is Vikramjit Singh: T20 विश्वचषकाच्या ( T20 World Cup 2022) सामन्यात भारत आणि नेदरलँड्स (India vs Netherlands) यांच्यात दुसरा सामना होत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) हा सामना खेळला जातोय. ज्यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग आणि नेदरलँडचा फलंदाज विक्रमजीत सिंग (Vikramjit Singh) आमनेसामने आहेत. 19 वर्षीय विक्रमजीत सिंग नेदरलँड्सच्या (Netherlands) सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विक्रमजीत सिंह मूळ पंजाबचा असून तो अवघ्या पाच वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांनी पंजाब सोडलं होतं नेदरलँडच्या या शीख खेळाडूबद्दल आज जाणून घेऊया.
विक्रमजीत सिंग नेदरलँड्सकडून खेळणारा पहिला शीख खेळाडू
1980 च्या दशकात भारतात शीख समुदायांविरुद्ध दंगली उसळल्या होत्या. तेव्हा विक्रमजीत सिंहचे वडील हरप्रीत सिंह (Vikramjit Singh) जालंधरजवळील चीमा खुर्द गावातून अचानक निघून गेले. पंजाबमधील वाढत्या बंडामुळं माझ्या वडिलांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी गाव सोडलं होतं, असं विक्रमजीत सिंहचे वडील हरप्रीत सिंह यांनी सांगितले. विक्रमजीत सिंह (Vikramjit Singh) फक्त 5 वर्षांचा होता. या 19 वर्षीय युवा खेळाडूचा जन्म नेदरलँडमध्ये झाला असून नेदरलँडकडून खेळणारा तो पहिला शीख खेळाडू आहे.
विक्रमजीत सिंगने चंदीगड येथून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले
नेदरलँड्स (Netherlands) अंडर-12 स्पर्धेदरम्यान कॅप्टन बोरेनची नजर 11 वर्षीय विक्रजीतवर पडली. त्यानंतर विक्रमजीटोला स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चरर्स कंपनीकडून प्रायोजकत्व मिळाले. या कंपनीने देशातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि हरभजन सिंग यांच्यासाठी बॅट बनवल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी विक्रमजीतने चंडीगढ, भारतातील उनियाल येथील गुरुसागर क्रिकेट अकादमीमध्ये 6 महिने प्रशिक्षण घेतले. 2021 मध्ये त्याने भारताचा माजी अंडर-19 खेळाडू तरुवर कोहलीसोबतही प्रशिक्षण घेतले.
वाचा : Twitter मधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार? एलॉन मस्क यांच्याकडे ताबा जाताच सूत्र चाळवली
विक्रमजीत सिंहचे आजोबा पंजाबला परतले
खुशी चीमा पंजाबमधून नेदरलँडमध्ये आल्यावर त्यांनी येथे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी काढली. आता हरप्रीत ही कंपनी चालवतो. त्यानंतर 2000 साली खुशी चीमा पुन्हा पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी परतले.