IND vs PAK: एशिया कप 2023 ( Asia Cup 2023 ) ला सुरुवात झाली असून क्रिकेट प्रेमींना उद्या होणाऱ्या सामन्याची उत्सुकता आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात सामना रंगणार असून बाबर आझम आणि रोहित शर्मा यांच्यात मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. अशातच आता बहुचर्चित सीमा हैदर या सामन्यामध्ये कोणाला सपोर्ट करणार हे समोर आलं आहे.
भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामन्याआधी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सीमाचा एक फोटो व्हायरल झाला असून 2 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात सीमा कोणत्या टीमला सपोर्ट करणार हे तिने सांगितलं आहे.
भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामना रंगण्यासाठी आता 24 तासांहून कमी वेळ उरला आहे. संपूर्ण देश ज्या सामन्याची वाट पाहतोय तो श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे. याच दरम्यान सचिनच्या प्रेमात भारतात आलेल्या सीमा हैदरने या सामन्याबाबत आपलं मत मांडलं आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) सामन्यापूर्वी सीमा हैदरने न्यूज 18 ला इंटरव्ह्यू दिलाय. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की, एशिया कप ( Asia Cup 2023 ) स्पर्धेसाठी भारत -पाकिस्तान सामना रंगणार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार?
या प्रश्नाचं उत्तर देताना सीमा हैदर म्हणाली की, मी टीम इंडियालाच सपोर्ट करणार आहे. मी अजिबात पाकिस्तानला सपोर्ट करणार आही. कारण मी भारतीय आहे, त्यामुळे मी भारत देशालाच सपोर्ट करणार आहे. माझं पाकिस्तान देशाशी आता कोणतंही नातं नाहीये. दरम्यान सीमाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
सीमा हैदरला क्रिकेट पाहण्याची खूप आवड आहे. वर्ल्डकप पाहण्यासाठी ती सचिनच्या प्रेमात पडून भारतात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, वर्ल्डकपनंतर ती पुन्हा पाकिस्तानात परतणार आहे का? सीमा हैदर पाकिस्तानातून फरार झाल्यानंतर एका स्थानिक पत्रकाराने तिच्या जुन्या मित्राची मुलाखत घेतली. ज्यामध्ये तो तरुण सीमा हैदरसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केलाय.
2023 मध्ये भारतात होणारा वर्ल्डकप पाहण्यासाठी सीमा तिथे गेली असल्याचा खुलासा तिच्या मित्राकडून या इंटरव्ह्यूमध्ये करण्यात आला. मात्र याउलट सीमाने भारतीय मीडियाला असं सांगितलंय की, तिला भारतातच रहायला आवडेल. ती पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही.