रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA 2nd ODI) खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रांचीत खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस केशव महाराजने (keshav Maharaj) जिंकला असून बॅंटींगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) 27 वर्षीय युवा खेळाडूने पदार्णण केले आहे. हा खेळाडू कोण आहे तो जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA 2nd ODI) दुसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियात (Team India) दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि ईशान किशनला (Ishan Kishan) डच्चू देण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी वॉशिग्टंन सुंदर संधी देण्यात आली आहे. तर 27 वर्षीय शाहबाज अहमद (Shahbaz ahmed) त्याचा डेब्यू सामना खेळत आहे.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 27 वर्षीय शाहबाज अहमदला (Shahbaz ahmed) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. शाहबाजने यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना बॅट आणि चेंडूने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे टीम इंडियात त्याला संधी मिळाली आहे.
शाहबाज अहमदला (Shahbaz ahmed) प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय चाहत्यांसोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहतेही अहमदच्या वनडे पदार्पणावर त्याचे अभिनंदन करत आहेत.
इंजिनीअर बनणार होता...
बंगालकडून क्रिकेट खेळणारा शाहबाज हा मूळचा हरियाणातील मेवात जिल्ह्यातील आहे. पण, हरियाणाहून बंगालमध्ये जाण्यामागे एक कथा आहे. खरे तर शाहबाजच्या वडिलांची इच्छा होती की त्याने इंजिनीअर व्हावे. त्यासाठी कॉलेजमध्ये त्याचे अॅडमिशनही झाले. त्यांनी 3 वर्षे अभ्यासही केला. पण क्रिकेटच काय त्याच्या अभ्यासात दबदबा होता. अखेरीस वडिलांनीही विचारले की क्रिकेट खेळायचे की अभ्यास. शाहबाजने मनापासून ऐकले आणि क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
7 सामन्यात 6 सेंच्यूरी मारल्या
शाहबाज गुडगावच्या क्रिकेट अकादमीमध्ये सराव करायचा. त्यांचे मित्र प्रमोद चंडिला यांच्या सांगण्यावरून तो बंगालला गेले आणि तिथे जाऊन तपन मेमोरियल क्लबमध्ये सहभागी झाला. या क्लबसाठी पहिल्या 7 सामन्यात त्याने 6 सेंच्यूरी मारल्या होत्या. याशिवाय तो गोलंदाजीही उत्कृष्ट करतो.
करिअर
बंगालसाठी 27 लिस्ट ए सामन्यांमध्ये शाहबाजने 47.28 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने या सामन्यांमध्ये चेंडूसह 24 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान
दक्षिण आफ्रिका संघ : जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज (कर्णधार), ब्योर्न फॉर्च्युइन, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे