मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला (IND vs SL 1st Test ) 4 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी ही पहिली कसोटी विविध कारणांने विशेष असणार आहे. (ind vs sl 1st test team india predicted playing 11 against sri lanka whom will get chance and whom not captain rohit sharma big challenge at mohali)
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) हा 100 वा कसोटी सामना (100 Test) असणार आहे. तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टेस्ट कॅप्टन म्हणून नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. मात्र याआधी रोहित समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
प्लेइंग इलेव्हन
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकसाठी एकूण 18 सदस्यीय संघांची निवड करण्यात आली आहे. या 18 जणांच्या स्कॅवडमध्ये तोडीस तोड आणि एकसे एक वरचढ खेळाडू आहे.
त्यामुळे पहिल्या सामन्यात या 18 पैकी कोणत्या 11 खेळाडूंना (ind vs sl 1st test team india predicted playing 11) संधी द्यायची, असा मोठा पेच कॅप्टन रोहितसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी द्यायची हे असं आव्हान रोहितसमोर असणार आहे.
विराटचा 100 वा सामना
विराट कोहलीसाठी या मालिकेतील श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना हा विशेष असणार आहे. हा सामना विराटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 सामना असणार आहे.
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.