मुंबई : "कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टीममधून डच्चू देण्यात आलेला नाही. जर एखाद्या खेळाडूची खेळण्याची शक्यता फार कमी असते, तेव्हा त्याला बायो-बबलमधून (Bio-Bubble) विश्रांती देणं योग्य ठरतं. कुलदीप गेल्या अनेक महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहे. बायो-बबलमध्ये राहणं हे फार आव्हानात्मक असतं. बायो-बबलमध्ये असताना खेळाडूचं मानसिक आरोग्य ही बाब महत्त्वाची असते. कुलदीपला संघातून वगळलं नसून त्याला विश्रांती देण्यात आली आहे", असं स्पष्टीकरण टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दिलं. दुसऱ्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत बुमराह बोलत होता. (ind vs sl 2nd test series team india vice captain jasprit bumrah reaction on kuldeep yadav during to press conference)
अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी फिट (IND vs SL 2ND Test Match) झाला. त्यामुळे कुलदीपला वगळून अक्षर पटेलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला. कुलदीपला आधीच सातत्याने डावळण्यात आलंय. त्यात त्याला पुन्हा वगळल्याने क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माही कुलदीपची कारकिर्द संपवत असल्याची टीका करण्यात आली. यानंतर अखेर आज दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला बुमराहने स्पष्टीकरण दिलं.
बायो-बबल म्हणजे काय?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून खबरदारी म्हणून खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येतं. खेळाडूंना कोरोनाचा कोणताही धोका संभवू नये, यासाठी बायो-बबलमध्ये ठेवलं जातं. मात्र बायो-बबलचे अनेक कडक नियम असतात. या नियमांचं पालन करणं खेळाडूंसाठी बंधनकारक आणि आव्हानात्मक असतं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 12 मार्चपासून बंगळुरुत दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यता येणार आहे. हा डे-नाईट सामना असून पिंक-बॉलचा वापर करण्यात येणार आहे.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.