मुंबई : टीम इंडिया आणि झिम्बाब्वमध्ये आज दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. टीम इंडियाच्या संघात एका मराळमोळ्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा आणखीण उंचावल्या आहेत.
पहिल्या वनडे सामन्यात मराठमोठा खेळाडू पालघर एक्सप्रेस शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार के एल राहूलवर टीका होत होती. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी देण्यात आली आहे.
शार्दुल ठाकूर गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डींग या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. अवघ्या काही बॉल्समध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता शार्दुलकडे आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकलेत. त्यामुळे झिम्बाब्वे मालिकेत टीम इंडियाला याचा फायदा होणार आहे.
टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतेय. पहिल्या वनडे सामन्यात 10 विकेटसने विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या वनडे सामन्यावर मोठा विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.
टीम इंडिया: शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वे टीम : तादिवानाशे मारुमणी, इनोसंट काईया, शॉन विल्यम्स, वेस्ली मधवेरे, सिकंदर रझा, रेगिस चकाबवा (c&wk), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्युची, रिचर्ड नागरावा.