India vs Ireland women, T20 World Cup 2023: टीम इंडियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या आहे. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या (smriti mandhana) 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ( Team India) ही धावसंख्या गाठता आली आहे.त्यामुळे आता आयर्लंड (Ireland women) समोर 156 धावांचे आव्हान असणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचे सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म होणार आहे. (ind w vs ire w t20 world cup 2023 team india give 156 target to ireland smriti mandhana half century)
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना (smriti mandhana) आणि शेफाली वर्मा सलामीला उतरल्या होत्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र शेफाली वर्मा 24 धावावर बाद झाली. तिच्यानंतर मैदानात उरलेली कर्णधार हरमनप्रीत कौर देखील जास्तवेळ मैदानात टीकू शकली नाही. ती देखील 13 धावा करून आऊट झाली. त्यानंतर मैदानात उरलेली रिचा घोष शुन्य धावावर आऊट झाली.
एकाबाजूला टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना स्मृतीने (smriti mandhana) एक बाजू भक्कम धरली होती. मंधाना तिच्या नेहमीच्या लयीत खेळत होती. मैदानावर विकेट पडत असताना देखील तिचा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. 87 धावांपर्यंत तिने मजल मारली होती. संपुर्ण देशवासियांना ती शतक ठोकेल अशी आशा होती, मात्र तिचे शतक हुकले. स्मृतीने (smriti mandhana)56 बॉलमध्ये 87 धावा ठोकल्या. या खेळीत तिने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
मंधानाच्या (smriti mandhana) विकेट नंतर एका मागून एक विकेट पडतच होते. फक्त जेमीमानेच 19 धावा ठोकल्या. अखेर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या उभारता आली आहे.आता आयर्लंड समोर 156 धावांचे आव्हान असणार आहे.
आयर्लंड आता या धावा पुर्ण करून विजय मिळवते की टीम इंडिया त्यांना 155 धावांच्या आत रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्य़ान आयर्लंड हा सामना जिंकून देखील बाहेर होणार आहे. तसेच जर टीम इंडिया जिंकल्यास त्याचे सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म होणार आहे.