India vs Bangladesh: २७ सप्टेंबर पासून भारत आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन दिवसीय कसोटी मालिका खेळवली जात आहे. हा मालिका कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. दुसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवशी पावसामुळे रद्द करण्यात आला तर आज ओल्या मैदानामुळे सामना खेळवता आला नाही. दुसऱ्या दिवशी पावसामुळे समान रद्द झाल्यावर तिसऱ्या दिवशी सामना होईल अशी अपेक्षा होती. परंतु आज (२९ सप्टेंबर) रोजी दिवसभरात तीन तपासण्या झाल्या, ज्यामध्ये पहिली तपासणी सकाळी १० वाजता, दुसरी तपासणी दुपारी १२ वाजता आणि तिसरी तपासणी दुपारी ०२ वाजता झाली. अखेरीस मैदान न सुकल्यामुळे भारत विरुद्ध बांगलादेश हा कसोटी सामना आजही रद्द करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी सकाळी थोडाही पाऊस पडला नाही. साडेनऊ वाजेपर्यंत मैदानावरचे सर्व कव्हरही काढून टाकण्यात आले होते. परंतु मैदानावर दोन ओले ठिपके पडले होते. एक पॅच बॉलिंग रन-अपच्या जवळ होता तर दुसरा आउटफिल्डमध्ये होता. हा ओलावा वाळवता आला नाही. यामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला.
हे ही वाचा: मॅच फी, दोन वर्षांची बंदी... IPL 2025 च्या आधी बनवले गेले 'हे' आठ मोठे नियम
प्रेक्षकांची निराशा
तिसऱ्या दिवशीही सामना रद्द झाल्यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांची निराशा झाली. आता सामन्याला फक्त दोन दिवस उरले असून केवळ ३५ षटकांचा खेळ झालेला आहे.
हे ही वाचा: IPL 2025: रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे कधी जाहीर केली जाणार? जाणून घ्या तारीख
अनिर्णित राहू शकतो सामना
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहू शकतो. परंतु कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचे मोठे नुकसान होऊ शकते. सामना अनिर्णित राहिल्याने भारताला बांगलादेशसोबत गुण शेअर करावे लागणार आहेत. पण भारताने कानपूर कसोटी जिंकल्यास त्याचे १२ गुण होतील. कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारताला ८ गुणांचे नुकसान सहन करावे लागेल.