मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तान हे लवकरच क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येणार, असे सर्वत्र वारे वाहत आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान लवकरच आमने सामने येणार अशी माहिती पाकिस्तानच्या एका उर्दु वृतपत्राने दिली. परंतू यावर आजून तरी BCCI चा निर्णय झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान मॅच म्हटलं, तर भारत आसो वा पाकिस्तान दोन्ही देशातल्या क्रिकेट प्रेमींमध्ये युद्ध खेळल्याचे भाव उमटतात.
भारत आणि पाकिस्तान मॅच खेळणार अशी चर्चा सुरु असताना इंझमाम-उल-हक पाकिस्तानचा माजी कॅप्टन याने, भारतीय संघाच्या खेळामुळे मनापासून प्रभावित झालो आहे, असे वक्तव्य केलं. (Inzamam Ul Haq to Team India) तो पुढे यावर गंमत करताना म्हणाला, "बहुधा भारताकडे असे मशीन आहे. जे अशा प्रतिभावान खेळाडूची निर्मिती करते." आता त्याला खरेच भारतीय टीमची स्तुती करायची होती? की, संपूर्ण जग टीम इंडियाची वाह वाह करत आहे, या गोष्टीमुळे त्याला मिरच्या झोंबल्या? त्याच्या या वाक्याचा नक्की अर्थ काय? हे तर इंझमामच सांगू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्रृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णाने आपला शानदार खेळ दाखवला. प्रसिद्ध कृष्णाने त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने 54 धावा करुन चार विकेट घेतले. त्याचवेळी, क्रृणाल पांड्याने वन डे सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंझमाम-उल-हक यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया सीरीजमुळे भारतीय संघात नवीन खेळाडूंना सातत्याने येऊन आपला खेळ दाखण्याची संधी मिळाली आहे.
इंझमाम आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, "मला वाटते की भारताकडे असे कोणते तरी मशीन आहे जे नवीन खेळाडू बनवते. यावेळी पुन्हा दोन खेळाडूंची इंन्ट्री झाली आहे आणि ही गोष्ट खेळाडूंना एक संदेश देते की, जर आपल्याला संघात रहायचे असेल तर, आपल्याला चांगली कामगिरी करावीच लागेल."
पुढे तो म्हणाले, "ऑस्ट्रेलियाच्या दौर्यापासून मी पाहत आहे की, युवा खेळाडू येतो आणि तो उत्कृष्ट प्रदर्शन करतो. सीनिअर खेळाडूंची स्वतःची भूमिका असते परंतु, जेव्हा जूनिअर खेळाडू असे प्रदर्शन करतात तेव्हा ते संघासाठी खूप चांगले ठरते.
शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, क्रृणाल पंड्या, ईशान किशन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा आणि टी नटराजन यांनी गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या स्वरूपात भारतासाठी आपले कर्तव्य पार पाडले आहेत. जवळपास प्रत्येकाने त्यांच्या पहिल्या मॅच किंवा सीरीजमध्ये चांगली कामगिरी केली आहे.