नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्धच्या ३ टी २० सामन्यात टीम इंडिया १-० ने पुढे आहे. बुधवारी कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ९३ रन्सने जबरदस्त विजय मिळवला.
आता दुसरा सामनाही टीम इंडियाच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. होळकर स्टेडिअममध्ये बॅट्समन्सचीच चलती राहणार आहे.
पण टॉस जिंकून जी टीम पहिली फिल्डिग करेल त्यांना फायदा होईल असे मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे क्यूरेटर समंदर सिंह चौहान यांनी सांगितले.
गुरूवारी इथे ढग जमा झाले होते आणि शुक्रवारीही वातावरण असेच राहणार आहे. त्यामूळे सात ते पावणे आठ पर्यंत धुक पडणार नाही.
म्हणजेच पहिले १० ओव्हर ओसचा प्रभाव दिसणार नाही. तरीही टॉस जिंकून बॉलींग करणे हा योग्य निर्णय होऊ शकतो.
'गवताला ओल होणार नाही अशा रसायनाचा वापर आम्ही करत आहोत. यावरुन दवाचे पाणी गवतावर टिकून राहणार नाही तर खाली पडेल.' असेही चौहान यांनी सांगितले.
कटकच्या सामन्यात दोन्ही टीमच्या स्पीनर्सना बॉलची पकड ठेवणं कठीण झाल होतं.