मुंबई : श्रीलंके विरुद्ध टी 20 मध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता कसोटी सीरिजसाठी सज्ज आहे. कसोटी सीरिजपूर्वी टीम इंडियासाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लांब असलेला घातक क्रिकेटपटू आता पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटसाठी मैदानात उतरणार आहे.
या घातक खेळाडूकडे अखेरच्या बॉलपर्यंत सामना पलटण्याचं कौशल्य आहे. इतकच नाही तर या घातक खेळाडूला विजयापर्यंत सामना कसा घेऊन जायचा याचंही कौशल्य ज्ञात आहे. धोनीचा खास मित्र आणि टीम इंडियाचा घातक क्रिकेटपटू आता श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात मैदानात उतरणार आहे.
4 मार्चपासून कसोटी सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. यासाठी रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. रविंद्र जडेजा श्रीलंके विरुद्ध कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. 4 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
रविंद्र जडेजावर कसोटी क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सातव्या क्रमांकावर तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. घातक गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग आणि कमी बॉलमध्ये जास्त धावांचा पाऊस असं त्रिसूत्र ओळखून रोहितने जडेजाला संघात समाविष्ट केलं आहे.
अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. जडेजा हाताच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला होता. त्याने न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. आता पुन्हा एकदा दमदार एन्ट्री श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात करणार आहे.
रविंद्र जडेजा मैदानात उतरणार याची कुणकुण श्रीलंकेच्या टीमला लागल्यानंतर खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे. आधीच टी 20 सीरिजमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता कसोटी सीरिजकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.