IND vs WI: दुसऱ्या वनडे सामन्यातून Team India चा हा खेळाडू Out

पहिल्या वनडे सामन्यात सुपर फ्लॉप, 'हा' खेळाडू संपुर्ण मालिका बेंचवर बसणार, कोण आहे हा खेळाडू ?

Updated: Jul 24, 2022, 08:35 PM IST
IND vs WI: दुसऱ्या वनडे सामन्यातून Team India चा हा खेळाडू Out title=

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने एका युवा खेळाडूला टीममधून बाहेर केलं आहे. तर आवेश खानला टीममध्ये संधी दिली आहे. या सामन्यातून आवेश खानने वनडेत पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्य़ात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने दुसऱ्या वनडे सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. धवनने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघातून बाहेर केले आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध एकाच सामन्यातील त्याच्या परफॉर्मन्स पाहून त्याला बाहेर बसवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.   

प्रसिद्ध कृष्णा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरला होता. त्याने पहिल्या सामन्यात 10 षटकात 62 धावा दिल्या होत्या. प्रसिद्ध कृष्णाला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे त्याचा हा खराब परफॉर्मन्स होता.

पहिल्या सामन्यातील खराब परफॉर्मन्समुळे शिखरने त्याला दुसऱ्या सामन्यात वगळले आहे. प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियासाठी ओझे ठरत होता. त्यामुळे आता प्रसिद्ध कृष्णाला उर्वरित सामन्यांमध्ये बेंच गरम करावी लागू शकते.