Sunil Chhetri On Messi Ronaldo: गेल्या काही महिन्यांपासून देशाता फुटबॉलची क्रेझ वाढल्याचं दिसतंय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार (Indian Team Captain) सुनील छेत्री सध्या चांगलाच चर्चेत आहे. छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच सॅफ चॅम्पियनशिप जिंकली. कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) पराभव करत फायनलमध्ये दणदणीत विजय नोंदवला. भारताने विजय मिळवल्यानंतर हजारो उपस्थितांनी एकसुरात वंदे मातरम (Vande Matram) गाण्यास सुरूवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषकही (Intercontinental Cup) जिंकला होता. त्यावेळी देखील सुनील छेत्री याने भारताला अतितटीच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 92 वा गोल मारून मेस्सी (Lionel Messi) आणि रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) पाठलाग करतोय. अशातच आता सुनील छेत्रीने असं वक्तव्य केलंय, जे ऐकून देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास जागा झाल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा देशासाठी माझं सर्वोत्तम देण्याचा विचार येतो तेव्हा मी मेस्सी आणि रोनाल्डोला मागे टाकू शकतो. मला सध्या खूप बरं वाटत आहे आणि मी देशासाठी चांगलं काम करण्यास प्रेरित आहे. ज्या दिवशी मला वाटणार नाही त्या दिवशी मी निघून जाईन. पण हे कधी होईल माहीत नाही, असंही सुनील छेत्री म्हणाला आहे.
आणखी वाचा - वर्ल्ड कपआधी ऋषभ पंत करणार टीम इंडियात कमबॅक; महत्त्वाची अपडेट समोर!
पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यानंतर तो तिसरा गोल (top international goal scorers) करणारा सक्रिय खेळाडू आहे. कॅप्टन सुनील छेत्रीने आतापर्यंत 142 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 92 गोल केले आहेत. तर या यादीत रोनाल्डो 123 गोलांसह पहिल्या तर मेस्सी 103 गोलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारतीय कॅप्टनचा (Indian Football Team Captain ) नंबर लागतो.
A thank you might not cut it. But it's all I have, Bengaluru. pic.twitter.com/EXF9AhifOw
— Sunil Chhetri (@chetrisunil11) July 6, 2023
दरम्यान, बंगळुरू येथे झालेल्या SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. भारताने नवव्यांदा सॅफ स्पर्धा जिंकली. यापूर्वी भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषकही जिंकला होता.