India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेशमधील (IndvsBan) दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने 188 धावांनी विजय मिळवला होता. दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने (IndvsBan Test Series) आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) मोठा विक्रम करण्याची संधी आहे. पुजाराच्या 18 धावा झाल्यावर तो दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहेत. (indvsBan second test 2022 cheteshwar pujara will join special club virat kohli sehwag and tendulkar latest marathi sport news)
चेतेश्वर पुजाराने 97 कसोटी सामन्यांमध्ये 6984 धावा केल्या असून 7 हजारांचा टप्पा पार करण्यापासून अवघ्या 18 धावा मागे आहे. बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये पुजाराला संधी आहे. पहिल्या कसोटीत पुजाराने 90 आणि नाबाद 102 धावा केल्या होत्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाल्यावर त्याने सुत्र आपल्या हाती घेत संघाला मजबुत स्थितीत पोहोचवल होतं.
चेतेश्वर पुजारा 18 धावा केल्यानंतर विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या विशेष क्लबमध्ये सामील होईल. भारतासाठी 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा भारतासाठी 8 वा फलंदाज ठरणार आहे.
दरम्यान, कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 15921 धावांसह सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड 13621, तिसऱ्या सुनिल गावस्कर 10122, चौथ्या स्थानी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण 8781, पाचव्या स्थानी वीरेंद्र सेहवाग 8502, सहाव्या स्थानी विराट कोहली 8094, सातव्या स्थानी सौरव गांगुली 7212 तर आता आठव्या 6984 क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आला आहे.