मुंबई: आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा झाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नुकताच पहिला सामना पार पडला. या सामन्यात कोहलीची टीम RCBला 2 विकेटस राखून मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवता आला आहे.
IPLच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली जखमी झाला आहे. मैदानात सामन्यादरम्यान कोहलीच्या डोळ्याखाली जखम झाल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं काय घडलं?
RCBने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीचा गोलंदाज काइल जेमिसन मुंबई इंडियन्स डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आला. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईचा फलंदाज कृणाल पंड्या हवेत शॉट खेळला.
कृणानं टोलवलेला चेंडू पकडण्यासाठी विराट कोहली पुढे आला. त्याच वेळी कॅच पकडण्याच्या नादात त्याच्या डोळ्याजवळ चेंडू लागल्यानं जखमी झाला. ही घटना नेमकी कशी घडली हे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
OUCH.
King Kohli cops it in the face! pic.twitter.com/qifA5Xn7Z2
— Fox Cricket (@FoxCricket) April 10, 2021
विराट कोहली जखमी झाल्यामुळे त्याच्या हातून चेंडू सुटला. कोहली जखमी झालेला असतानाही त्यानं मैदान सोडलं नाही. तो मैदानात कायम राहिला.
शेवटच्या ओव्हरनं तर संपूर्ण खेळ बदलला. मुंबई इंडियन्स जिंकणार असं वाटत असतानाच एबी डिविलियर्सने शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल गेली आणि बाजी पलटवली. त्याने 27 चेंडूमध्ये 48 धावा केल्या.