मुंबई : बंगळुरू टीमचं प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या स्वप्नाला हैदराबादने सुरुंग लावला आहे. हैदराबादने 9 विकेट्सने एकहाती सामना जिंकला. 23 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात बंगळुरू टीमचा 9 विकेट्सने पराभव झाला. त्यासोबत लाजीरवाणा पराभवही बंगळुरूचा नावावर झाला. 23 एप्रिल ही तारीख पुन्हा बंगळुरूसाठी धोक्याची आणि भीतीची ठरली.
2017 साली असाच सामना झाला होता. त्यावेळी घडलेला प्रकार पुन्हा हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात घडल्याने या तारखेबद्दल एक वेगळीच दहशत निर्माण झाल्याची चर्चा आहे. तारीख आणि घटनेत सामन्य होतं. फक्त टीम वेगळी होती.
आयपीएलच्या इतिहासात सहाव्यांदा तर बंगळुरूच्या आतापर्यंतच्या सामन्यात दुसऱ्यांदा सर्वात कमी धावांचा स्कोअर झाला होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 68 धावांवर पूर्ण टीम तंबुत परतली. 23 एप्रिल रोजीच्या जुन्या वाईट आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. 23 एप्रिल बंगलुरू हा दिवस कधीच विसरू शकणार नाही.
आयपीएलमध्ये 2013 साली बंगळुरूने तुफान फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारला. टीमने 263-5 केल्या होत्या तर ख्रिस गेलनं 66 बॉलमध्ये 175 धावा केल्या. गेलनं 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. आयपीएलच्या इतिहासातलं सर्वात जलद शतक होतं.
23 एप्रिल 2017 मध्ये बंगळुरूने पहिल्या सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. 49 धावांवर संपूर्ण टीम तंबुत परतली. त्यानंतर 23 एप्रिल 2022 मध्ये 68 धावा करून पूर्ण टीम तंबुत परतली आहे. बंगळुरूच्या नावावर हा दुसरा लाजीरवाणा रेकॉर्ड आहे. जो कोणत्याही टीमला आपल्या नावावर होऊ असंच वाटत असेल. बंगळुरू 23 एप्रिल हा दिवस कधी विसरणार नाही.