IPL 2023: आयपीएल वर मॅच फिक्सिंगचं सावट, प्रत्येक सामन्यावर तब्बल 'इतक्या' कोटींचा सट्टा?

IPL Cricket Betting: आयपीएलच्या सोळ्यावा हंगामाला (IPL 2023) सुरुवात व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर मॅच फिक्सिंगचं सावट पसरलं आहे

Updated: Mar 30, 2023, 07:01 PM IST
IPL 2023: आयपीएल वर मॅच फिक्सिंगचं सावट, प्रत्येक सामन्यावर तब्बल 'इतक्या' कोटींचा सट्टा? title=

IPL 2023 Cricket Betting: जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएलला 31 मार्चपासून सुरवात होतेय. गतविजेती गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यानच्या (Chennai Super Kings) सामन्याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला (IPL 2023) सुरुवात होईल. जगभरातील करोडो क्रिकेट प्रेमींना आयपीएलची उत्सुकता आहे. पण आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी काही तास उरले असतानाच मॅच फिक्सिंगसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. 

अहमदाबादमध्ये रंगणार सामना
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअममध्ये सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स विजयी सुरुवात करण्यासाठी उतरेल. तर गेल्या हंगामात तळाल्या असलेली चेन्नई सुपर किंग्स यंदा महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली  नव्या उत्साहाने मैदानात उतरेल.

सट्टेबाज आणि मॅच फिक्सर्सची सामन्यावर नजर
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेल्या आयपीएलची उत्सुकता जितकी क्रिकेट चाहत्यांना असेत तितकीच जगभरातील बुकी आणि मॅचफिक्सरही (Match Fixer) यावर नजर ठेवून असतात. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधीत असणारे सट्टेबाज दुबई आणि कराचीमध्ये बसून सट्टा (Betting) चालवतात. यात भारतातील अनेक शहरांमधून मोठा पैसा लागला आहे. यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ आणि हैदराबादसारख्या शहरांचा समावेश आहे. सट्टा लावण्यासाठी सट्टेबाजांनी कोडही ठरवले आहेत. 

सट्टेबाजीसाठी अनेक अॅप
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना सट्ट्याशी संबंधीत 18 अॅप आणि 60 सट्टेबाजांच्या नेटवर्कची माहिती मिळाली आहे. या अॅपच्या माध्यमातून आयपीएलवर सट्टा लावला जातो. गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यानच्या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्यात आला होता. यावेळी मुंबई पोलिसांनी मोठ्या टोळीचा छडा लावला होता.

करोडोंचा लागतो सट्टा
आयपीएल स्पर्धा जितकी लोकप्रिय आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यावर सट्टा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर अंदाजे 3,500 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. स्पर्धेत 10 संघ आहेत. हे दहा संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार असून एकूण 74 सामने आहेत. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकात सट्टेबाजीचा हा आकडा किती कोटीमध्ये असेल.