IPL 2024 SRH vs CSK: आयपीएल 2024 मध्ये आज अठरावा सामना खेळवला जाणार असून गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने सामने असणार आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्या नोंदवणाऱ्या सनरायजर्सला त्यांच्याच मैदानात हरवण्याचं आव्हान चेन्नईसमोर असणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) काही बदल होण्याची शक्यता आहे. तर हैदराबादचा संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार नाहीत.
पिच रिपोर्ट
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. अशाच चेन्नई आणि हैदराबादचा सामना हायस्कोरिंग होण्याची शक्यता आहे. याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना सनरायजर्स हैदराबादने आयपीएल (IPL 2024) इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली होती. हैदराबादने पहिली फलंदाजी करताना तब्बल 277 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) 246 धावां केल्या.
या संपूर्ण सामन्यात तब्बल 38 षटकार आणि 31 चौकारांची बरसात झाली होती. या सामन्यात चाळीस षटकात तब्बल 523 धावा झाल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. टी20 क्रिकेटमधलं हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. तर हैदराबादच्याच ट्रेव्हिस हेडने 18 चेंडूत अर्धशतक लगावलं.
आता चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्यात हा विक्रम मोडला जाणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मॅच प्रेडिक्शन
चेन्नईने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3 सामने खेळलेत. यात दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर सनरायजर्स हैदराबादला तीन सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आलाय. या मैदानावरचा आतापर्यंतचा इतिहास पाहाता होम ग्राऊंडवर खेळणारा संघ विजयी ठरलाय.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरिल मिचेल, समीर रिजवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना/शार्दुल ठाकुर. .
इम्पॅक्ट प्लेयर- महीश थीक्षाना/मथीशा पथिराना.
सनराइजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
मयंक अग्रवाल, ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, पॅट कमिंस, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, जयदेव उनादकट.
इम्पॅक्ट प्लेयर- वाशिंगटन सुंदर/उमरान मलिक.