IPL 2024, DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने (delhi capitals) अखेर परभवाचा वचपा काढला आहे. दिल्ली कॅपिटल्स समोर मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दिल्लीने आपलं होमग्राऊंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर रेकॉर्डब्रेक खेळी करत मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली आहे. हा सामना जिंकत दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 मध्ये दमदार कमबॅक केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. टॉस जिंकत दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 257 धावांचे टार्गेट दिले. 257 धावांचे टार्गेट पूर्ण करताना मुंबई इंडियन्सची चांगलीच दमछाक झाली. 257 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ पुरता गारद झाला. 247 धावांचा डोंगर मुंबई इंडियन्ससा रचता आला. अखेर 10 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यापूर्वी दिल्ली आणि मुंबई यांच्यात सामना झाला होता. मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात मुंबईने 234 धावा काढस्या होत्या. या सामन्या मुंबईने होम ग्राऊंडवर दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला होता. आता दिल्लीने आपल्या होम ग्राऊंडवर मुंबईला पराभावचे पाणी पाजले.
शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच खेळ संपल होता. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 25 धावांची गरज होती. तिलक वर्माने 32 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार मारत 63 धावांचा डोंगर रचला होता. अखेर तिलक वर्मा रन आऊट झाला आणि मुंबई इंडियन्सला जबरदस्त झटका बसला. रोहित शर्माने 8 चेंडूत 8 धावा काढल्या. खलीलच्या चेंडूवर तो बाद झाला. तर, इशान किशने 14 चेंडूत 20 धावा काढल्या. मुकेशच्या चेंडूवर अक्षर पटेल कॅचआऊट झाला.
मुंबई इंडियन्सचाचा परभव करत दिल्ली कॅपिटल्सने प्ले ऑफमध्ये आपली पकड अधिकत मजबूत केली आहे. दिल्ली आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत. या विजयासह दिल्लीने 10 गुणांसह गुणतालिकेत 5व्या स्थान मिळवले आहे. तर, मुंबई प्लेऑफ मध्ये नवव्या स्थानावर आहे, मुंबईने 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत. यामुळे मुंबईचे बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे.