मुंबई : आयपीएल २०१८ साठी खेळाडूंचा लिलाव सोहळा नुकताचं पार पडला. आयपीएलच्या लिलावात पहिल्या दिवशी एक मजेशीर गोष्ट पहायला मिळाली. कारण, एकीकडे एका खेळाडूवर बोली लागली जात होती तर दुसरीकडे त्याचीच पत्नी टीव्हीवर अँकरिंग करत होती.
आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलं आहे. आम्ही बोलत आहोत स्टुअर्ट बिन्नी आणि त्याची पत्नी मयंती लँगर यांच्याबाबत.
आयपीएल २०१८च्या लिलावा दरम्यान स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्सच्या टीमने बेस प्राईस (५० लाख रुपये) वर खरेदी केलं. स्टुअर्ट बिन्नी एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे आणि मयंती लँगर फुटबॉल, क्रिकेटचा टीव्हीवरील एक ग्लॅमरस चेहरा आहे.
लिलावा दरम्यान मयंती लँगर टीव्ही शो होस्ट करत होती आणि दुसरीकडे स्टुअर्ट बिन्नीवर बोली लावण्यात येत होती. गेल्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत असलेल्या स्टुअर्ट बिन्नीला यंदा रिटेन केलं नाही.
त्यामुळे स्टुअर्ट बिन्नीला ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं. २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजयात स्टुअर्ट बिन्नीचं मोलाचं योगदान होतं.
२०१७च्या आयपीएल सीजनमध्ये स्टुअर्ट बिन्नीचं प्रदर्शन फार चांगलं राहीलं नव्हतं. त्याने आठ मॅचेसमध्ये केवळ ७८ रन्स केले आणि चार विकेट्स घेतले होते. गेल्यावर्षी कर्नाटक प्रिमिअर लीगमधील एका मॅचमध्ये मयंती लँगरने पहिल्यांदा आपला पती स्टुअर्ट बिन्नी याची मुलाखत घेतली होती.
मयंती लँगरने स्टुअर्ट बिन्नीची घेतलेली ही मुलाखत खूपच खास ठरली कारण याच दिवशी त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता.
राजस्थान रॉयल्स: बेन स्टोक्स (१२.५० कोटी रुपये), जयदेव उनाडकट (११.५० कोटी रुपये), संजू सॅमसन (८ कोटी रुपये), जोफ्रा आर्चर (७.२ कोटी रुपये), कृष्णाप्पा गौतम (६.२० कोटी रुपये), जोस बटलर (४.४० कोटी रुपये), अजिंक्य रहाणे (४ कोटी रुपये), डार्सी शॉर्ट (४ कोटी रुपये), राहुल त्रिपाठी (३.४० कोटी रुपये), धवल कुलकर्णी (७५ लाख रुपये), जाहिर खान पकतीन (६० लाख रुपये), स्टुअर्ट बिन्नी, बेन लॉगलिन, दुशमंथा चमीरा (दोघेही ५०-५० लाख रुपये), अनुरीत सिंह, आर्यमान बिक्रम (दोघेही ३०-३० लाख रुपये), श्रेयस गोपाल, मिधुन एस, जतिन सक्सेना, अंकित शर्मा, प्रशांत चोपड़ा, महिपाल लोमरर (सर्व खेळाडू २०-२० लाख रुपये).
यंदाच्या लिलावामध्ये भारताचा फास्ट बॉलर जयदेव उनाडकट सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. उनाडकटला राजस्थान रॉयल्सनं ११.५० कोटी रुपयांना विकत घेतलं.
इंग्लंडचा बेन स्टोक्स गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सनं १२.५० कोटी रुपयांना विकत घेतलं.