मुंबई : टीम इंडियात नव्याने उभारी घेणारा स्टार इशान किशनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात 56 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीनंतर केएल राहुल आणि शिखर धवन यांना संघात स्थान मिळविणे कठीण झाले आहे.
टीम इंडियाने दुसर्या टी -20 सामन्यात इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने आता 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात संघाचा युवा फलंदाज इशान किशनने 56 धावा करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
विशेष म्हणजे इशानने पदार्पण सामन्यात हा डाव खेळला. पण इशानची खेळी संघातील बड्या खेळाडूंसाठी चिंतेचा विषय बनली आहे. इशान व्यतिरिक्त सलामीवीर म्हणून भारतीय संघात रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल अशी मोठी नावे आहेत.
पहिल्या सामन्यातच ईशानची मोलाची कामगिरी
दुसर्या टी -२० क्रिकेट सामन्यात भारताकडून पदार्पण करणारे ईशानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोलाची कामगिरी केली. फक्त 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा फटकावल्या. या स्फोटक डावासाठी त्याला पहिल्याच टी -२० क्रिकेट सामन्यात 'सामनावीर' म्हणूनही निवडले गेले. इशानच्या धडाकेबाज फलंदाजीमुऴे त्याला भारताचा पुढील मोठा स्टार मानले जात आहे.
राहुलला पुन्हा संधी मिळेल का?
इशान किशन करत असलेल्या तुफान फलंदाजीमुऴे संघात त्याचे स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्यासोबत कोण इनिंगची सुरुवात करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पहिल्या दोन सामन्यात विश्रांती दिलेला रोहित शर्मा संघात परत येऊ शकतो. रोहित सध्या जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज आहे. पण जर केएल राहुलला विराटने पुन्हा एक संधी दिली तर रोहित शर्माला पुढच्या सामन्यात ही खेळता येणार नाही.
टी -20 रँकिंगमध्येही राहुल दुसर्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांमध्ये राहुलला संघात संधी दिली जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेच ठरेल.
धवनच्या अडचणीत वाढ
इशान किशनचा सर्वोत्तम चमकदार कामगिरीमुऴे सलामीवीर शिखर धवन यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वेळ प्रसंगी त्यांना संघातून वगळले जाऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धवनला संधी देण्यात आली होती, परंतु केवळ 4 धावा करत तो बाद झाला होता.
दुसर्या सामन्यात गब्बर बाद झाला आणि ईशानने मैदानात चुरस निर्माण केली. आगामी सामन्यांमध्ये धवनला पुन्हा संघात संधी मिळणे कठीण दिसत आहे.