T20 World Cup 2024: टीम इंडियाचे खेळाडू केवळ भारतात नाहीत तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. आपल्या भारतात क्रिकेटबाबत इतकं टॅलेंट आहे की, प्रत्येक जण टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी यशस्वी होत नाहीये. त्यामुळे अनेक खेळाडू परदेशात जाऊन क्रिकेटमध्ये संधी शोधू लागले आहेत. यापैकी एक नाव आहे युगांडाकडून खेळणारा अल्पेश रामजानी याचं. अल्पेशचा जन्म मुंबईत झाला. रामजानी याने एक दिवस आपल्या भारत देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु येथे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे क्रिकेटच्या संधीच्या शोधात तो युगांडामध्ये गेला होता.
अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं. रामजानी मुंबईच्या देशांतर्गत टीमसाठी अंडर-16 आणि अंडर-19 स्तरावर खेळला आहे. इतकंच नाही तर रजणी ट्रॉफीच्या 2 सिझनसाठी टीममध्ये अल्पेशचा समावेश होता.
रामजानी व्यतिरिक्त, रोनक पटेल आणि दिनेश नाक्राणी हे दोन भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. जे 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत युगांडाच्या टीमकडून खेळणार आहेत.
अंडर-16 आणि अंडर-19 च्या काली अल्पेश केवळ श्रेयस अय्यरसोबतच नाही तर शिवम दुबेसोबतही खेळला आहे. अल्पेश श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत क्रिकेट खेळला. अल्पेश फॉर्च्युन ग्रुपमध्ये काम करत होता, पण कोविड-19 महामारीच्या काळात ग्रुपने क्रीडा विभाग बंद केला होता. यावेळी त्याच्या वडिलांचं बांधकाम व्यवसायात मोठं नुकसान झाले होते, त्यामुळे अल्पेशच्या कुटुंबाला युगांडामध्ये स्थलांतरित व्हावं लागलं होतं.
अल्पेश रामजानी याच्या सांगण्यानुसार, युगांडा क्रिकेट असोसिएशनने त्याला कधीही दुसऱ्या देशातून आल्यासारखं वागवलं नाही. रामजानी स्वतः या देशात क्रिकेटला चालना देण्यासाठी अथक प्रयत्न करत होता. यावेळी त्याने आयसीसी आणि युगांडा क्रिकेट असोसिएशनचेही कौतुक केलं. सध्याच्या घडीला क्रिकेट हा युगांडातील रग्बी आणि फुटबॉल नंतर तिसरा सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे.