ऑकलँड : न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने इंग्लंड विरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १८वी सेंच्युरी झळकावली आहे. या सेंच्युरीसोबतच केन विलियमसनने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला असला तरी विलियमसनने खेळलेल्या खेळीने सर्वांनाचं आकर्षित केलं.
विलियमसनने १०२ रन्सची इनिंग खेळली मात्र, पावसामुळे केवळ २३.१ ओव्हर्सचाच खेळ झाला. न्यूझीलंडचा कॅप्टन आऊट होण्यापूर्वी आपल्या टीमला चांगला स्कोअर उभारुन दिला.
या शानदार इनिंग सोबतच केन विलियमसनने न्यूझीलंडतर्फे टेस्ट मॅचेसमध्ये सर्वाधिक सेंच्युरी लगावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विलियमसनने इंग्लंड विरोधात पहिल्या टेस्ट मॅच दरम्यान आपली १८ वी सेंच्युरी पूर्ण करत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
२७ वर्षीय विलियमसनने मॅचच्या दुसऱ्या दिवशी ९२ रन्सहून आपली इनिंग पूढे सुरु केली होती. या रेकॉर्डसोबतच विलियमसनने मार्टिन क्रो आणि रॉस टेलर यांना मागे टाकलं आहे. या दोघांच्या नावावर १७-१७ सेंच्युरीचा रेकॉर्ड आहे. आपल्या करिअरमधील ६४वी टेस्ट मॅच खेळणाऱ्या विलियमसनने आतापर्यंत ५१.११ च्या सरासरीने ५३१६ रन्स बनवले आहेत.
With the rain getting heavier at @edenparknz, we've got time to enjoy one of the brighter spots in the day - Kane Williamson's record 18th Test century. = @skysportnz #NZvENG pic.twitter.com/H0uIQ0nSCK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 23, 2018
न्यूझीलंडच्या टीमकडून केवळ सहा बॅट्समनने दहाहून अधिक सेंच्युरी लगावल्या आहेत. यामध्ये विलियमसन, टेलर आणि मार्टिन क्रो यांच्या व्यतिरिक्त जॉन राईट आणि ब्रँडन मॅक्युलम (दोघांनी १२ सेंच्युरी) तर, अॅस्टनने ११ सेंच्युरी लगावल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी लगावण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (५१ सेंच्युरी) नावावर आहे.