केविन पीटरसन विराटला म्हणाला 'I Love You, एक दिवसाची सुट्टी घे आपण...'

India vs England, T20 World Cup 2022: विराटचे जगभरात फॅन्स आहेत. तर काही खेळाडू देखील विराटची बॉटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतात. इंग्लंडचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू केपी म्हणजेच केविन पीटरसन देखील विराटचा जबरा फॅन...

Updated: Nov 13, 2022, 10:05 PM IST
केविन पीटरसन विराटला म्हणाला 'I Love You, एक दिवसाची सुट्टी घे आपण...' title=
Kevin Peterson on Virat Kohli

Kevin Peterson on Virat Kohli : संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) मोक्याच्या क्षणी खास कामगिरी करता आली नाही. सेमीफायनल सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव (IND vs ENG) पत्करावा लागला. त्यामुळे भारताचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) केलेली कामगिरी सर्वांच्या लक्षात राहिली. सर्वच विजयात विराटचा मोलाचा वाटा होता.

विराटचे जगभरात फॅन्स आहेत. तर काही खेळाडू देखील विराटची बॉटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतात. इंग्लंडचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू केपी म्हणजेच केविन पीटरसन (Kevin Peterson) देखील विराटचा फॅन आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेर या दोघांची दोस्ती पहायला मिळते. अशातच केपीच्या (KP) एका खास कमेंटमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा - Jos Buttler: लहानपणी स्वप्न पाहिलं, आज सत्यात उतरवलं...अन् बटलरने एका हातात उंचावली World Cup ची ट्रॉफी!

इंग्लंड विरुद्ध सामन्यासाठी विराट नेटमध्ये (Virat Kohli Video) घाम गाळत होता. त्यावेळीचा विराट कोहलीच्या या पोस्टवर केविन पीटरसनने कमेंट (Kevin Peterson Comment on Virat Kohli Post) केली. त्यानंतर पीटरसनची ती कमेंट खूप व्हायरल होत आहे. विराटच्या या पोस्टवर (Virat Kohli Instagram) पीटरसन त्याला गुरुवारी एक दिवस सुट्टी घेण्याची विनंती करताना दिसतोय. मित्रा, कृपया गुरुवारी सुट्टी घे! तुला माहित आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, त्यामुळे या गुरुवारी चिल्ल मारूया, असं विराटच्या पोस्टवर कमेंट करत पीटरसन म्हणतो.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान, विराट कोहलीच्या या पोस्टवर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) कमेंट केली आहे. Angaaaar म्हणत विराटच्या बॉटिंग त्यानं कौतूक केलंय. अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानने (Rashid Khan) देखील कोहलीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अखेरच्या सामन्यात विराटने मेहनतीने धावसंख्या उभारली होती. मात्र, गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अपूरंच राहिलंय.