IPL 2023, LSG Vs RCB Prediction Playing 11 : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 43 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (LSG Vs RCB) आमने-सामने येणार आहेत. हा सामना लखनऊ इकाना स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. या आधी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरुला लखनौकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आज बंगळुरूचा संघ पराभवाचा बदला घेणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने पंजाब किंग्ज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शानदार विजय मिळवला. दुसरीकडे गेल्या सामन्यात आरसीबी संघाचा कोलकात्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या दोन्ही संघाची प्लेइंग 11 (LSG Vs RCB Prediction Playing 11) कशी असणार आहे ते जाणून घेऊया...
लखनऊ संघाचा हा हा दुसरा सीझन आहे. हेड टू हेट आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, लखनऊ बंगळुरूचे परदे जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये बंगळुरूने दोनदा तर लखनऊ एकदा विजय मिळवला आहे. दरम्यान काही कारणास्तव RCB चा नियमित कर्णधार फक्त फलंदाजीसाठी येणार असून आरसीबी संघांची कमान विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे एलएसजी विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामना खूपच रोमांचक होणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीचा संघ की के एल राहुलचा संघ जिंकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. केकेआरविरुद्ध (KKR) संघाच्या गोलंदाजांची कामगिरी काही विशेष नव्हती. मात्र, फलंदाजीत विराट कोहलीची फलंदाजी चांगलीच रंगली आणि त्याने या मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावले. फाफ डुप्लेसी आणि ग्लेन मॅक्सवेल हे शेवटच्या सामन्यात निश्चितच काही विशेष करू शकले नाहीत.
या हंगामात लखनऊ संघाने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यांमध्ये जिंकले आहेत तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाबचा पराभव केला होता. पंजाबविरुद्ध संघाच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. काइल मेयर्सने अवघ्या 24 चेंडूत 54 धावांची स्फोटक खेळी खेळली. तर आयुष बडोनीने अवघ्या 24 चेंडूत 43 धावा केल्या. त्याचवेळी निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 धावा करत बॅटने कहर केला.
या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 4 पराभव स्वीकारावा लागला. यामुळे या संघाचे 8 गुण आहेत. मागील सामन्यात बंगळुरूचा कोलकाताकडून पराभव झाला असता.
इकाना स्टेडियमवरील खेळपट्टी लखनऊ फलंदाजांसाठी अवघड मानली जाते. ही खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे. पहिल्या डावाच्या सुरुवातीलाच फलंदाजांना ही खेळपट्टी खूप मदत करते. सुरुवातीच्या षटकारांमध्ये या खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे फलंदाजांना सोपे जाणार आहे. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 152 आहे. या मोसमातील मागील सामन्यात गुजरात टायटन्सने 135 धावांचे आव्हान राखून सामना सात धावांनी जिंकला होता.
सोमवारी लखनऊमध्ये हवामान चांगले राहणार नसून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचे तापमान 27 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल, काइल मेयर्स, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, आवेश खान, यश ठाकूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजय कुमार वैशाख, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.