मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 'चेन्नई' टीम चांगलंच खेळतेय... यामुळेच ही टीम प्ले ऑफमध्ये स्थान पक्क करण्यात यशस्वी ठरलीय. टीमच्या या यशात सर्वात मोठा वाट कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचाच आहे. आपल्या शानदार खेळीनं माहीनं अनेक गोलंदाजांना घाम फोडला. धोनीचे चाहते जगभर पसरलेत हे तर आपल्याला माहीतच आहे... पण, भारतापेक्षाही 'माही'चे अधिक फॅन्स पाकिस्तानात आहेत, असं म्हटलं तर वावगं वाटायला नको...
पाकिस्तानची मॉडल मथिरा मोहम्मद हीदेखील धोनीच्या फॅन्सपैंकी एक... त्यामुळेच मथिरा आणि धोनीचा किस्सा आजही चर्चिला जातोय. भारतीय टीमच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान ही कहाणी समोर आली होती. ज्या हॉटेलमध्ये भारतीय टीम आणि पाकिस्तानी टीम उतरली होती... त्याच हॉटेलमध्ये मथिराही थांबली होती.
मथिरा या दरम्यान पाकिस्तानी टीमला भेटण्यासाठी उत्सुक होती. दोन्ही टीमचे खेळाडू जेवण घेत असताना मथिरा तिथं दाखल झाली... परंतु, पाकिस्तान टीमच्या मॅनेजरनं मथिराला पाकिस्तानी टीमशी भेटण्याची परवानगी नाकारली आणि तिला दरवाजातूनच परत फिरावं लागलं...
जवळच बसलेला धोनी हे सर्व पाहत होता... त्याला हे पटलं नसल्यानं पुढे होऊन त्यानं मथिराला ऑटोग्राफ दिला... आणि तिला प्रोत्साहीत केलं... त्यामुळेच आजही मथिरा धोनीची प्रशंसक आहे.