Fifa Final 2022 Kylian Mbappe : अर्जेंटिना आणि फ्रान्समधील (Argentina vs France Fina 2022) फायनल सामन्यात थरारक विजय मिळलतच तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलंय तब्बल 36 वर्षानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. श्वास रोखून धरायला सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला अखेर अर्जेंटिनाने विजय मिळवलाच. फुलबॉलचा जादूगर लिओनल मेस्सीसाठी ग्रँड फायनल होती. मेस्सी आणि गोलकीपर डी. मारटीनेज (D martinez) अर्जेंटिनाच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. दुसरीकडे फ्रान्स सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यापासून वंचित राहिला. एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढलात्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला. (Mbappe score a hattrick in the FIFA World Cup final latest marathi news)
अर्जेंटिनाकडून सामन्याच्या 23 व्या मिनिटाल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर डी मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला होता. पहिल्या हाल्पमध्ये अर्जेंटिनाकडे आघाडी होती. सामना पूर्णपणे अर्जेंटिनाच्या पारड्यात झुकला होता. दुसऱ्या हाल्फच्या शेवटाला पेनल्टी मिळाल्यावर फ्रान्सच्या एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पहिला आणि 81 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली.
90 मिनिटांमध्ये सामना 2-2 च्या बरोबरीत सुटला, त्यानंतर 30 मिनिटांचा एक्सट्रा टाईम देण्यात आला. मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आणि 108 व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात आघाडी घेतली. सर्व हताश झाले होते कारण सामना जवळपास फ्रान्सने जिंकला होता मात्र तितक्यात हँड झाला आणि एम्बाप्पेने तिसरा गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. एम्बाप्पेने वर्ल्ड कप फायनल सामन्यात 3 गोल करत इतिहास रचला आहे. असा विक्रम करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे.