Mohammad Kaif On Virat Kohli : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघात तगडी लढत आज पहायला मिळणार आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024) टीम इंडियाचा दुसरा सामना आज पाकिस्ताविरुद्ध नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळवला जाईल. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याला मोलाचा सल्ला दिलाय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप असून देखील मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Virat Kohli) आपला स्ट्राईक रेट कमी ठेवण्याचा सल्ला दिलाय. कैफने असं का म्हटलं? त्यावेळी त्याने विराटला कोणत्या क्रमांकावर खेळण्याचा सल्ला दिलाय? पाहा
Mohammad Kaif काय म्हणाला?
पाकिस्तानला विसरून जा, विराट कोहली पाकिस्तानसाठीच नाही तर सर्व संघांसाठी घातक ठरू शकतो. कोणत्याही संघाला त्याला बाद करण्यासाठी धडपड करावी लागते. पण मला असं वाटतं की, त्याने त्याचं अॅग्रेशन थोडं कमी करावं. पाकिस्तानविरुद्धच्या खेळपट्टीवर खूप काही अवलंबून असेल. आयर्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटने क्रीजमधून बाहेर पडून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण 5 चेंडूत केवळ 1 धाव घेऊन बाद झाला, आक्रमकतेचा परिणाम पहायला मिळाला, असं मोहम्मद कैफ म्हणतो.
फार आक्रमक खेळण्याऐवजी तुम्ही 130 च्या स्ट्राईक रेटने खेळलं तर चांगल होईल. 140 किंवा 150 च्या स्ट्राईक रेटने खेळण्याची गरज नाहीये. खराब बॉलची वाट बघ आणि मग शॉट खेळ, असं मोहम्मद कैफने म्हटलंय. मला वाटतं की तो कदाचित तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकेल. विराटने ओपन केलं आणि मी समजू शकतो की तो उद्या देखील ओपन करेल, पण मला वाटतं की, बॉल फिरत असलेल्या खेळपट्टीवर विराट कोहलीने नंबर 3 वर खेळणं योग्य ठरेल. तो अखेरपर्यंत झुंज देऊ शकतो, असं मोहम्मद कैफने म्हटलं आहे.
भारत-पाकिस्तान मॅचमध्ये सर्वांच्या नजरा आहेत त्या विराट कोहलीवर... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधात विराटची बॅट नेहमीच तळपत असते... त्याने आतापर्यंत 10 मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलरला सळो की पळो करून सोडलंय. कोहलीनं 81.33च्या सरासरीनं 488 रन्स केलेत. त्यात 5 अर्धशतक झळकावलेत. कोहलीच्या तुलनेत हिटमॅन रोहित शर्माची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी निराशजनक ठरलीय. त्याने 11 मॅचमध्ये 14.25 च्या सरासरीनं केवळ 114 रन्स केलेत. मात्र, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकत रोहित शर्मानं टी-20 वर्ल्डकपमध्ये दमदार सुरुवात केलीय. त्यामुळे आजच्या रोहितच्या बॅटिंगकडं त्याचे चाहते लक्ष लावून बसलेत.
पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.