Vicky Kaushal danced in Chhaava : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते तो म्हणजे 'छावा'. विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर काल 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याशिवाय विकी कौशलची भूमिका आणि त्याचा अभिनय पाहुन नेटकरी त्याचं कौतूक करत आहेत. तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी दिग्दर्शकावर संताप व्यक्त केला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचं कारण काय आहे? तक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवलं आहे. हे अनेक प्रेक्षकांना आवडलेलं नाही. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर नेटकरी या ट्रेलरला शेअर करत त्यावर चर्चा करताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आता छत्रपती संभाजी महाराजांना ब्रेक डान्स करताना पाहायचं का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ते एक जरा जास्त झालं. बाजीरावाला नाचवलं तेव्हा पण आवडलं नव्हतं आणि आत्ता पण नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, '2025 मध्ये मला छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना पाहणार असं वाटलंच नव्हतं आणि याची आशाही केली नव्हती. विनंती आहे की कोणत्याही ऐतिहासीक भूमिका नाचताना दाखवू नका.'
Chhaava | Official Trailer | Vicky K | Rashmika M | Akshaye K | Dinesh Vijan | Laxman U | 14th Feb
byu/EfficientHospital900 inBollyBlindsNGossip
आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे काय. सुरुवातीच्या काही क्षणातच संभाजी महाराजांना नाचताना दाखवलं. मला फार वाईट वाटतंय की दिग्दर्शक हा मराठी असून त्यानं असं काही दाखवण्याचं धाडस केलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'देवा, त्यांनी ऐतिहासीक भूमिकांना मसाला मुव्ही बनवलं आहे. अमेरिकेच्या चित्रपटांकडे पाहा. ते आजही ऐतिहासिक भूमिका या हीरोप्रमाणेच दाखवतात. त्यात एक जिवंतपणा वाटतो त्यात असं दाखवत नाहीत की त्यांना कोणी हरवू शकत नाही.'
याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी विकी आणि रश्मिकाला मराठीत न बोलताना पाहून नाराजी व्यक्त केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'जेव्हा महत्त्वाच्या भूमिका या मराठी आहेत तर ते दोघं मराठी भाषेत न बोलता हिंदीमध्ये का बोलतायत. हे पाहणं सहन होतं नाही आहे.' तर अनेकांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासोबत छावाची तुलना केली आहे. त्यांनी म्हटलं की 'बाजीराव मस्तानी'मध्ये रणवीर सिंगनं आणि प्रियांका चोप्रानं जे काम केलं त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. त्या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी देखील खूप मेहनत घेतली होती. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी दिग्दर्शकांवर टीका केली आहे.
हेही वाचा : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार
दरम्यान, 'छावा' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.