Urfi Javed Pole Dance Video : उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी आणि स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी ती तिचे हटके व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच उर्फीने तिचा पोल डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा तोल गेल्याचे दिसत आहे. यादरम्यान तिची ट्रेनर येते आणि तिला वाचवते.
व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फी पोल डान्स करताना दिसत आहे. यावेळी उर्फीने स्पोर्ट्स ब्रा आणि जांभळ्या रंगाची शॉर्ट परिधान करून पोल डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा ट्रेनर तिला यात मदत करत आहे, पण अचानक उर्फीचा तोल जातो आणि ती खाली पडते. मात्र, तिची ट्रेनर तात्काळ तिची काळजी घेते, त्यामुळे ती एका मोठ्या अपघातापासून वाचते.
उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक तर तिच्या या पोल डान्सचे कौतुक करत आहेत. ज्यामध्ये तिने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत आहेत. मात्र, अनेक चाहते तिच्या या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
उर्फी जावेद वर्क फ्रंट
सध्या उर्फी जावेद अनेक टीव्ही शोमध्ये दिसत आहे. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दर्गा, बडे भैया की दुल्हनिया यांसारख्या टीव्ही शो मध्ये दिसत आहे. पण उर्फी जावेदला बिग बॉसमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. याच शोमधून ती रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. यानंतर उर्फीच्या हटके लूकने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिलीये. नुकतीच उर्फी जावेदची वेब सीरिज रिलीज झाली, ज्याचे नाव 'फॉलो कर लो यार' आहे. हा सीरिज OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओजवर रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये उर्फीच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची ओळख करून देण्यात आली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.