मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. यो-यो टेस्टमध्ये फास्ट बॉलर मोहम्मद शमी अयशस्वी ठरला आहे. बंगळुरूच्या एनसीएमध्ये शमीची ही टेस्ट घेण्यात आली. यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टला शमी मुकणार आहे. शमीऐवजी दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. २०१७-१८ च्या रणजी मोसमात सैनीनं ८ मॅचमध्ये ३४ विकेट घेतल्या. भारतीय खेळाडूंना नेटमध्ये सराव देण्यासाठीही सैनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता.
२७ वर्षांचा मोहम्मद शमीला फिटनेसनं आत्तापर्यंत अनेकवेळा सतावलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शमी तिन्ही टेस्ट खेळला होता. या मॅचमध्ये त्यानं एकूण १५ विकेट घेतल्या. १४ जूनपासून भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एकमेव टेस्ट बंगळुरूमध्ये होणार आहे.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, ऋद्धीमान सहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, नवदीप सैनी, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर