धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट

एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 26, 2024, 01:47 PM IST
धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट  title=
(Photo Credit : Social Media)

MS Dhoni IPL 2025 : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसतो. यंदा आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी सर्व फ्रेंचायझींना आपली रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2025) खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे. 

धोनीने दिले संकेत : 

धोनीने एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मोठे संकेत दिले आहेत की तो 2025 आणि त्यानंतर सुद्धा आयपीएलमध्ये खेळणं सुरु ठेवेल. त्याने सांगितले की पुढील अजून काही वर्षे क्रिकेट खेळण्यासाठी तो स्वतःला फिट ठेवेल. धोनी केवळ आयपीएल 2025 साठीच नाही तर शक्यतो मेगा लिलावानंतर संपूर्ण तीन वर्षांच्या चक्रासाठी CSK च्या योजनांचा भाग राहील. 

धोनी नेमकं काय म्हणाला? 

धोनीला एका गोव्यातील कार्यक्रमात आयपीएल 2025 मध्ये तो खेळणार की नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, "'माझ्या शेवटच्या वर्षांत जे काही क्रिकेट खेळता येईल त्याचा आनंद मला घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक खेळ म्हणून क्रिकेट खेळता तेव्हा खेळ म्हणून त्याचा आनंद घेणे कठीण होते. मला हेच करायचे आहे. हे सोपे नाही. भावना येत राहतात, वचनबद्धता येत राहते. मला पुढील काही वर्षे खेळाचा आनंद घ्यायचा आहे".

हेही वाचा : IPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी

 

फिटनेसवर लक्ष देतायत धोनी : 

धोनीने पुढे जे म्हंटले त्यावरून स्पष्ट होतं की आयपीएलमध्ये खेळण्याबाबत तो निश्चितच विचार करतोय. चेन्नई सुपरकिंग्सच्या माजी कर्णधार धोनीने सांगितले की, "मला स्वतःला ९ महिने फिट राहायचंय जेणेकरून मी अडीच महिने आयपीएलमध्ये खेळू शकेन. त्यासाठी तुम्हाला नियोजन करावे लागेल, पण थोडी विश्रांतीही घेणे गरजेचे आहे. 

अनकॅप खेळाडू म्हणून रिटेन होणार धोनी? 

मीडिया रिपोर्टनुसार चेन्नई सुपरकिंग्स माजी कर्णधार एम एस धोनी याला आयपीएल 2025 साठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकते. जर असे झाले तर  सीएसके धोनीला 4 कोटींमध्ये रिटेन करू शकते. ज्या खेळाडूने मागील 5 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत तसेच ज्यांच्याकडे बीसीसीआयचे  सेंट्रल कॉन्ट्रेक्ट नाही असे खेळाडू अनकॅप खेळाडू म्हणून निवडले जाऊ शकतात. 31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे.