World Cup 2023: वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला धक्क्यावर धक्के; 'या' दोन बड्या खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती!

Pakistan cricketer announce retirements: पाकिस्तानला वर्ल्ड कपआधी (ICC ODI World Cup 2023) धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्चानच्या दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिडाविश्वास चर्चेला उधाण आलंय.

Updated: Jul 9, 2023, 07:47 PM IST
World Cup 2023: वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला धक्क्यावर धक्के; 'या' दोन बड्या खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती! title=
Pakistan cricketer ehsan adil and hammad azam announce international retirements

ICC ODI World Cup 2023: यंदाच्या वर्षी आयसीसी वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकदिवसीय विश्वचषकचं वेळापत्रक आयसीसीकडून  (ICC) जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही पारंपारिक विरोधी संघ आमने सामने येणार आहेत. अशातच आता पाकिस्तानला वर्ल्ड कपआधी धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्चानच्या दोन खेळाडूंनी निवृत्ती (Pakistan cricketer announce retirements) जाहीर केल्याने क्रिडाविश्वास चर्चेला उधाण आलंय.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आज वेगवान गोलंदाज एहसान आदिल (ehsan adil) आणि अष्टपैलू हम्माद आझम (hammad azam) यांच्या निवृत्तीची घोषणा केली. पाकिस्तानमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा हम्माद आपल्या देशात संधी नसल्यामुळे यूएसएला गेला आहे. मेजर लीग क्रिकेटसाठी संधी मिळाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला होता. मेजर लीग क्रिकेट ही युनायटेड स्टेट्समधील आगामी व्यावसायिक टी-ट्वेंटी क्रिकेट लीग आहे.

आणखी वाचा - World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!

एहसानने फेब्रुवारी 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. 2015 पर्यंत आणखी दोन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळला होता. एहसान 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या पुरुष अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचा सदस्य होता. हम्माद आझम हा न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2010 मध्ये पाकिस्तानसाठी खेळला होता. त्याने 2011 ते 2015 पर्यंत 11 एकदिवसीय सामने त्यात 80 धावा आणि दोन विकेट मिळल्या होत्या. तसेच पाच टी-20 सामन्यात 34 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला संघात संधी मिळाली नाही.

दरम्यान, वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. त्याआधी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 जुलैपासून तर दुसरा कसोटी सामना 24 जुलैपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.