Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिक 2024 मधून दररोज रंजक तर कधी विचित्र बातम्या समोर येतायत. सध्या अशीच एक बातमीने जगभरातील करोडो क्रीडा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका महिला जलतरणपटूचं अफाट सौंदर्य तिच्यासाठीच संकट ठरलंय. या महिला जलतरणपटूच्या सौंदर्यामुळे तिच्याच संघातील खेळाडूंनी लक्ष विचलित होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने कारवाई करत तिला मायदेशी पाठवून दिलं. या बातमीने क्रीडाप्रेमी हैराण झाले आहेत.
कोण आहे ती स्विमर?
या जलतरणपटूचं नाव लुआना अलोंसो (Luana Alonso) असं असून ती पॅराग्वे (Paraguayan) देशाची खेळाडू आहे. अवघ्या 20 वर्षांच्या लुआनाला ऑलिम्पिक व्हिलेजमधली (Olympic Villege) तिची रुम रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार पॅराग्वेच्या अनेक खेळाडूंनी लुआनाची तक्रार केली होती. तिच्या सौंदर्यामुळे लक्ष विचलित होत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये लुआनाचं राहाणं इतर खेळाडूंसाठी ठिक नसल्याचं कारण देत तिला मायदेश धाडण्यात आलं.
काय आहे खरं कारण?
लुआना अलोंसो हिने स्विमिंगच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात भाग घेतला होता. 27 जुलैला झालेल्या या प्रकाराच्या सेमीफायनलमध्ये लुआनाचा पराभव झाला. यानंतर तिला मायदेशी जाण्यास सांगण्यात आलं. तसंच लुआनाच्या वर्तणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली होती. ऑलम्पिक व्हिलेजमध्ये लुआना खेळाडूंमधील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. तसंच इतर खेळाडूंना त्यांच्या स्पर्धेवेळी पाठिंबा देण्याऐवजी लुआना तिथल्या डिस्नेलँडमध्ये फिरण्यासाठी गेली होती, असंही सागंण्यात येतंय.
त्यामुळे पॅराग्वेच्या संघ व्यवस्थापनाने तिच्यावर कारवाई केली. पॅराग्वे ऑलिम्पिक समितीचे प्रमुख लॅरिसा शायरर यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं असून यात त्यांनी लुआनाच्या उपस्थितीमुळे पॅराग्वेच्या संघात अयोग्य वातावरण तयार होत असल्याचं म्हटलंय, तसंच लुआना ही तिच्या मर्जीने ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडल्याचंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
लुआनाने जाहीर केली निवृत्ती
पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडचाच जलतरणपटू लुआना अलोन्सोने निवृत्ती जाहीर केली आहे. तसंच ऑलिम्पिक व्हिलेजमधून हकालपट्टी केल्याच्या बातम्याही खोट्या असल्याचं तीने म्हटलं आहे. खोटी माहिती पसरवणं बंद करा असं आव्हान तिने केलं आहे. लुआनाने आपल्या इन्स्टा पेजवर ऑलिम्पिकमध्ये भाग घेतानाचा एक फोटो शेअर केला असून 'हे अधिकृत आहे, मी जलतरणातून निवृत्तहोत आहे, पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार असं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर लुआनाचे 565 हजार फॉलोअर्स आहेत.