टीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात

जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो. 

Updated: Jan 15, 2023, 07:58 PM IST
टीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात title=

Ravindra Jadeja comeback : भारतीय टीमचा (Team India) ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Sl test Series) कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातंय. टीम इंडियामध्ये त्याचं सिलेक्शन झालंय, मात्र बीसीसीआयकडून (BCCI) त्याला क्लीन चीट देण्यात आलेली नाही. त्याच्या फीटनेसवर लक्ष देता जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो. 

एशिया कपपासून टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या Ravindra Jadeja च्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे. यासाठीच त्याचं सिलेक्शन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी करण्यात आलं आहे. मात्र सिरीज सुरु होण्यापूर्वी त्याचं फिटनेस तपासलं जाणारा आहे.

फिटनेस तपासण्यासाठी 24 जानेवारी रोजी रणजी ट्रॉफीच्या सौराष्ट्रकडून रविंद्र जडेजा तामिळनाडूविरूद्ध खेळणाता दिसणार आहे. या सामन्याद्वारे तो सर्जरीनंतर मैदानात उतरणार आहे.  

NCA च्या रिहॅबमध्ये आहे Ravindra Jadeja

ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा फिटनेसच्या तपासणीसाठी बंगळुरूच्या NCA मध्ये घाम गाळतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करता जडेजा त्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्येही चांगली कामगिरी करतो. NCA मध्ये त्याची फिटनेस टेस्ट केल्यानंतर 17 सदस्यांच्या टीममध्ये त्याला सामील करण्यात आलं आहे. 

Ravindra Jadeja मिडल ऑर्डरमध्ये टीमसाठी ठरणार फायदेशीर

टीम इंडियामध्ये ऋषभ पंतशिवाय डावखुरा फलंदाज एकंही नाहीये. पंतच्या मोठ्या अपघातानंतर टीम इंडियातील रवींद्र जडेजाची भूमिका अजून वाढते. 5व्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी जडेजा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याशिवाय तो गोलंदाजीमध्ये अश्विनसोबत चांगली कामगिरी करू शकते.

श्रीलंका सिरीजविषयी जडेजाचं मोठं विधान

भारत आणि श्रीलंकेमधील दुसऱ्या वनडे सामन्यानंतर जडेजाने, काही बोलू नका, फक्त स्माईल करत रहा, असं म्हटलं आहे. भारताने सामना जिंकल्यावर जडेजाने ट्विट केल्याने ते व्हायरल झालं आहे. जडेजालाअक्षरच्या दमदार प्रदर्शनामुळे संघात पुनरागमन करण्यासाठी कठीण जावू शकतं. अक्षरला खेळताना पाहून जडेजालाही असंच काहीसं वाटलं असावं म्हणून त्याने हे ट्विट केल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे.